Editor

आदित्य ठाकरेंना कोविडची लागण ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोविडची लागण झाली असून संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात राहून स्वत:ची चाचणी करावी असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केले. प्रकृती अस्वस्थामुळे आदित्य ठाकरे यांनी कोरोना चाचणी केली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे …

Read More »

१५४ कोटी रूपयांचा कोविड लसीचा प्रकल्प मुंबईत कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन …

Read More »

१० वी, १२ वीच्या परिक्षेसाठी मंत्री गायकवाड यांनी केल्या या घोषणा प्रात्यक्षिक परिक्षा होणार लेखीनंतर: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा लिखाण सराव कमी झाला असल्याने यंदाच्या १० वी आणि १२ वीच्या परिक्षेचा कालावधी ३० मिनिटांनी वाढविण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित …

Read More »

आता खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सामाजिक अंतर राखणे सोईस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा …

Read More »

या कारणासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची झाली बत्तीगुल २० मिनिटासाठी मंत्रालय राहिले वीजेविना

Mantralay

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्लॅकआऊटची घटना ताजी असताना आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची वीज तब्बल २० मिनीटसाठी खंडित झाली. त्यामुळे मंत्रालयात आलेल्या काही मंत्र्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना काळोखात राहण्याची वेळ आली. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक विभागांना आपली कामे करता आली नाहीत. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे वीज खंडीत झाल्याची माहिती मंत्रालयातील वीज …

Read More »

कोरोनाच्या काळात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचा अट्टाहास का? शिधावाटप संघटना आक्रमक

मुंबईः प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई / ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसऱ्याबाजूला मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून बोगस शिधा पत्रकधारकांना शोधण्यासाठी नव्याने नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले. परंतु केंद्र सरकारची वन नेशन वन कार्ड हे अभियान राबविले जात असताना आणि कोरोनाबाधितांची …

Read More »

भाजपाने दिली महाविकास आघाडीला “हुकूमशाही” सरकारची उपमा नावाजलेल्या पोलिसांना नको ती कामे करावी लागत असल्याचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी अॅन्टालिया बंगल्याजवळ स्फोटक सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाकडून सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्याता आता महाविकास आघाडी सरकारचे नामकरण करत “हुकूमशाही ठाकरे सरकार” अशी उपहासात्मक उपमा ट्विट करत दिली. हि स्फोटक ज्या गाडीत आढळून आले. त्या गाडीचा …

Read More »

वरळीच्या दूध डेअरीच्या जागेवर आता पर्यटन विभागाची टोलेजंग इमारत ? वापर होत नसलेली जागा राज्य सरकारला परत करा

मुंबईः विशेष प्रतिनिधी वरळी येथील तब्बल २५ एकर जागेवर राज्य सरकारच्या मालकीची दूध डेअरी सुरु करण्यात आली. परंतु ही दूध डेअरीकडून पूर्वीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात दूध व्यवसाय करत आहे. त्यामुळे सदरची जमिन राज्य सरकारला परत करावी या अनुषंगाचे पत्र नुकतेच महसूल विभागाने वरळी येथील शासकिय दूध डेअरीला लिहिले असून …

Read More »

कोरोना : मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर मंडळात कहर; २४ तासात २३ हजारापार २३ हजार १७९ नवे बाधित, ९ हजार १३८ बरे तर ८४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल १७ हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. त्यात आज एकदम ६ हजाराने वाढ होत तब्बल २३ हजार १७९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत २३७७ सह ठाणे मंडळात ४ हजार ८११, नाशिक मंडळात ४ हजार १७, पुणे मंडळात ५ हजार २६८, नागपूर मंडळात ४ हजार …

Read More »

फडणवीसांचा गौप्यस्फोट, वाझेसाठी उध्दव ठाकरेंनी मला फोन केला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर थेट निशाना

नवी दिल्ली: प्रतिनिधी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे किंवा मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे फार लहान आहेत. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही, तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज …

Read More »