Editor

कोरोना : महिन्यात ३ ऱ्यांदा बाधितांच्या तर १ ल्यांदा मृतकांच्या संख्येत घट ३ हजार ६४५ नवे बाधित, ९ हजार ९०५ बरे होवून घरी तर फक्त ८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आज महिन्यातील ३ ऱ्यांदा बाधित रूग्णांच्या संख्येत घट झाली असून मागील २४ तासात ३ हजार ६४५ बाधित आढळून आले आहेत. तर त्याहून तीन पट अर्थात ९ हजार ९०५ बाधित बरे होवून घरी परतल्याचे आकडेवारी पुढे आली आहे. आजच्या तबाधित रूग्णांच्या संख्येमुळे  एकूण बाधितांच्या संख्या १६ लाख …

Read More »

कोरोना : बाधितांची संख्या कमीच तर आतापर्यंत ८६ लाख तपासण्या पूर्ण ६ हजार ५९ नवे बाधित, ५ हजार ६४८ बरे झाले तर ११२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत ८६ लाख ८ हजार ९२८ इतक्या तपासण्या पूर्ण झाल्या असून या तपासण्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या १६ लाख ४५ हजार २० वर पोहोचली आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला बाधितांच्या रूग्णांत घट येण्यास सुरुवात झालेली ती अद्यापही कायम आहे. त्यानुसार मागील २४ तासात ६ हजार ५९ इतके …

Read More »

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरें म्हणाले, आमचं हिंदूत्व थाळ्या-घंटा बडविणारे नाही भाजपाने आमचं सरकार पाडण्याआधी स्वत:च सरकार साभांळावे

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचं संकट आहे. पण मंदीर उघडत नसल्याने काहीजण मला माझं हिंदूत्व विचारत असून ते म्हणतात मी सेक्युलर झाला की काय? असा प्रश्न विचारत आहेत. आम्हाला कोणाकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नसून आमचं हिंदूत्व हे थाळ्या-घंटा बडविणार नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या प्रमाणे अतिरेक्यांना मारणारं हिंदूत्व …

Read More »

आजी/माजी सैनिकांच्या मुलांसाठी आता ५ जागा नव्हे तर ५ टक्के जागा राखीव व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवा नियम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या पूर्वीची जास्तीत जास्त ५ जागेची अट रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज …

Read More »

खडसेंची भविष्यवाणी आणि भाजपा समर्थक विद्यमान आमदार शिवसेनेत मिरा-भांईदरमधील माजी आमदार मेहताच्या त्रासाला कंटाळून

मुंबई : प्रतिनिधी भाजपामधील अंतर्गत असंतोष एकनाथ खडसे यांच्यानिमित्ताने बाहेर उफाळून आल्यानंतर त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ आता मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार तथा मुळच्या भाजपाच्या मात्र आता समर्थक असलेल्या गीता जैन यांनीही भाजपाची साथ सोडत थेट शिवसेनेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राज्यात भाजपा पक्ष संघटनेचा …

Read More »

कोरोना : २५ लाख घरगुती विलगीकरणात मात्र दैंनदिन बाधित कमीच ६ हजार ४१७ नवे बाधित, १० हजार ४ बरे झाले तर १३७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात तब्बल २५ लाख कोरोना रूग्ण घरगुती विलगीकरणात असून १४ हजार १७० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्णांची संख्या आजही कमी असून आली असून २४ तासात ६ हजार ४१७ आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ४० हजार १९४ तर एकूण बाधितांची संख्या १६ लाख …

Read More »

सर्वोच्च असो किंवा कोणतेही न्यायालय ६ महिन्यानंतर स्थगिती आदेश संपुष्टात येणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर

Mantralay

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील एखाद्या क्रिमिनल किंवा दिवाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासह देशातील कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली असेल मात्र त्यास ६ महिन्याचा कालावधी उलटून गेला असेल तर त्या स्थगितीचा आदेश आपोआप रद्दबातल होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे आदेश जारी करण्यात आल्याचे …

Read More »

महाराष्ट्रातही कोरोना लस मोफत देशातल्या सगळ्याच मिळणार असल्याची अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा भाजपाने केली. त्यानंतर अनेक राज्यांनी मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही राज्यातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे सांगत देशातील प्रत्येकालाच मोफत लस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बिहार निवडणूकीत …

Read More »

फडणवीस म्हणाले, विश्रांती घ्यावी अशी परमेश्वरांची इच्छा असावी म्हणून कोरोनाची लागण संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आणि विलगीकरणात राहण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सत्यनारायण यांनी ईश्वराच्या करणीमुळे देशात कोरोनाची साथ असल्याचे अजब तर्कट मांडले. त्याचधर्तीवर आता भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनीही सतत काम करत राहील्याने आपण विश्रांती घ्यावी ईश्वराची असावी म्हणून कोरोनाची लागण झाल्याचे अजब तर्कट मांडले. त्यामुळे ईश्वरामुळे कोरोनाची लागण …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना फसविणारी भाजपाचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असताना हवालदिल शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर केले तरी त्यामधील कृषी पिके व घरे यासाठी ५,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जाहीर केलेल्या ९,७७६ कोटी रुपयांपैकी रस्ते पुलासाठी २,६३५ कोटी रुपये, नगर विकाससाठी ३०० कोटी,  महावितरण करीता २३९ कोटी रुपये, जलसंपदा करीता १०२ कोटी रुपये, ग्रामीण …

Read More »