Editor

राज्यपालांवर कुत्सित टीका करणे जाणत्या राजाला शोभत नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांना टोला

मुंबईः प्रतिनिधी घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कुत्सितपणे उत्तर पाठविण्याचा दृष्टिकोन जाणत्या राजाला शोभत नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता विकासकांसाठी आता नवीन मार्गदर्शक सूचना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता 11 सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय रद्द करून नवीन मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल. 1. विकासक नोंदणी व विकासक पात्रतेसंदर्भातील नवीन मार्गदर्शक सुचना (guidelines) /निकष …

Read More »

या कारणामुळे अखेर धारावीची निविदा रद्द राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील २० वर्षापासून रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास आणखी रखडणार असून फडणवीस सरकारच्या काळात ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या सुरु झालेल्या हालचाली अखेर आज पूर्ण होत राज्य मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आता धारावीसाठी पुन्हा नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात धारावीसाठी दुबईशी संबधित सेखलिंक या …

Read More »

वीज बीलप्रश्नी राज भेटले राज्यपालांना, मात्र सल्ला दिला पवारांना भेटण्याचा शरद पवार यांच्या टोल्यानंतर राज्यपालांची सावध पवित्रा

मुंबईः प्रतिनिधी लॉकडाऊन काळापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीज बील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याप्रश्नी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत निवेदन दिले. त्यावर राज्यपालांनी याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच प्रसारमाध्यमांना दिली. …

Read More »

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना आरोग्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर सदरप्रकरणी यापूर्वीच चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय आरोग्य मिशन संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करणारी माहिती दिली असून त्यात ते म्हणातात, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत मागील शासनाने मंत्रीगटाची नेमणूक केली होती. तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून …

Read More »

भुजबळ म्हणाले, OBC समाजाच्या मागण्यांबाबतचा अहवाल लवकरच सादर आज झालेल्या बैठकीत चर्चा

मुंबई : प्रतिनिधी OBC अर्थात इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण, आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा व इतर लाभांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन परिणामकारक कार्यवाही होण्याच्यादृष्टीने तसेच अतिरिक्त सवलती व लाभ प्रस्तावित करण्यासंदर्भातील अहवाल लवकरच  मंत्रिमंडळाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली. मंत्रालयात मंत्रीमंडळ …

Read More »

कोरोना: बाधित रूग्णांबरोबर मृतकांच्या संख्येतही घट ६ हजार ७३८ नवे बाधित, ८ हजार ४३० बरे झाले तर ९१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सातत्याने बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत असून ३० हजारापार दैनदिन आढळणारे रूग्णांची संख्या आता १० हजाराच्या आत आली आहे. तसेच याही संख्येत आता घट होत असून ती ५ हजाराच्या आत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर काल ३ हजार ५०० रूग्णांची …

Read More »

लोकल सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर रेल्वेने दिले हे उत्तर सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबतच्या योजनेवर काम सुरु

मुंबई : प्रतिनिधी शहर आणि उपनगरात लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याच्या अनुषंगाने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीकोनातून राज्य सरकारने पाठविलेल्या पत्रावर आम्ही करत असल्याची माहिती मध्य रेल्वेने एका ट्विटच्या माध्यमातून ट्विटरवर दिले. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यात प्रवाशांमध्ये शाररीक अंतर पाळले जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून योजना करणे आवश्यक …

Read More »

राज्य सरकारचा प्रस्ताव….पण रेल्वेने मंजूरी दिल्यास सर्वांसाठी लोकल सुरु मदत व पुर्नवसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांचे पत्र

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे उपनगरीय गाड्या कधी सुरू होणार याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत होती. तसेच कधी एकदा लोकल गाडी सुरू होते अशी अवस्था झाली होती. यावर आता लोकल रेल्वे सर्वच नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सर्वांनाच लोकलने प्रवास …

Read More »

“जनराज्यपाल” या पुस्तकावरून शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना टोला राज्यघटनेत जनराज्यपाल पदच नसल्याचे खोचक पत्र

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी पद स्विकारल्यापासून केलेल्या कामाचा आढावा पुस्तक स्वरूपात “जनराज्यपाल ” नावाने प्रकाशित केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना खोचक पत्र लिहिले. त्यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्राने अनुभवत असतानाच भविष्यात पवार विरुद्ध …

Read More »