मुंबई : प्रतिनिधी अत्यंत दुर्दैवी घटना- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना यापूर्वी कधी घडलेली नाही. राज्यपाल हे व्यक्ती नाही एक पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. परंतु, विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही. आजपर्यंत मी एवढे इगोस्टीक सरकार कधी पहिले नाही,अशी …
Read More »कोरोना चाचणी करायचीय? थांबा आता फिरती चाचणी गाडी येतेय संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा- मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार …
Read More »लघु उद्योग महामंडळ, खादी ग्रामोद्योगच्या या वस्तू आता फ्लिपकार्टवर या दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार- उद्योग मंत्री देसाई
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या लघु उद्योग महामंडळ तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाकडून उत्पादीत होणाऱ्या वस्तूंना देशीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यातील स्थानिक कामगार विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांनी तयार केलेल्या वस्तुंना देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योगमंत्री …
Read More »विमानावरून काय खुलासा राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने दिला माहित आहे का? जाणून घ्या काय दिले दोन्ही कार्यालयाकडून खुलासे दिले
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच संदेश राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक …
Read More »सरकारी विमान वापरावरून सरकार विरूध्द राज्यपाल-भाजपा राजभवन सचिवालय, मुख्यमंत्री कार्यालयाकडून परस्पर विरोधी दावे
मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारी कामासाठी डेहराडूनला जाण्यासाठी सरकारी विमान वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली. मात्र त्यास परवानगी दिल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे, तर त्याबाबत कोणतीच माहिती राज्य सरकारकडून कळविण्यात आली नसल्याचा प्रतित्तुर राजभवनाकडून कळविण्यात आल्याने सरकारी विमान वापरावरून राज्य सरकार विरूध्द …
Read More »यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारेंना मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषा विभागाचे विंदा करंदीकर जीवनगौरव, श्री. पू. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक हे चार पुरस्कार अनुक्रमे रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, डॉ.सुधीर रसाळ व संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री …
Read More »मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मेहता आता रेराचे प्रमुख; तर मुख्य सचिव पदी कुंटेची शक्यता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली अजोय मेहतांना शपथ
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शासकिय सल्लागार अजोय मेहता यांची आता महारेरा अर्थात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील निवृत्त सनदी अधिकारी गौतम चटर्जी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या ठिकाणी मेहता यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव पदी सीताराम …
Read More »या पध्दतीने भरतीत मराठा युवकांना संधी देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा- अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या युवकांना सरकारी नोकरीत संधी मिळावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला, यावेळी ऊर्जा विभागाने मराठा उमेदवारांसाठी ते प्रमाण पत्र सादर केल्यास भरतीत संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इतर विभागाच्या नोकर भरतीतही अशा प्रकारे मराठा समाजाच्या …
Read More »नव्या आणि २०१९ च्या एमएसईबीच्या भरतीत मराठा उमेदवारांना मिळणार अशी संधी ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध- ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे महावितरणला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी महावितरण कंपनीद्वारे २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व पदवीधर शिकाऊ अभियंता- स्थापत्य, पदविकाधारक शिकाऊ अभियंता- वितरण/स्थापत्य या पदांच्या भरतीसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) लाभ घेण्याचा पर्याय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला …
Read More »ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले घेणार राज्यातील शिक्षकांचा “तास” प्रत्येक जिल्ह्यात ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आणि ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी राज्यातील सर्व …
Read More »
Marathi e-Batmya