मुंबई: प्रतिनिधी मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपाचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले आहे. कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जिवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्यांच्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …
Read More »शेतकऱ्यानों घाबरू नका, टोळाधाडीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्याही माध्यमातून या टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याबाबत प्रयोग करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २४ मेच्या सुमारास मध्य …
Read More »सॉलिसीटर जनरल म्हणाले, मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने नव्हे तर राज्यांनी केला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्यांचा खोटरडेपणा उघडकीस- चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी
मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांना गृहराज्यात पाठवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात ८५ टक्के खर्च केंद्र सरकार करत असल्याच्या भाजपाच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. या प्रवाशांच्या तिकीटाचा सर्व खर्च हा राज्य सरकारांनीच केल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातून भाजपाचा खोटारडेपणा उघड …
Read More »विधान परिषदेचे आमदार म्हणतात, अधिवेशन “झुम” अॅपवर घ्या अंतिम निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन घ्यायचे की नाही यावरून संभ्रम निर्माण झालेला असताना विधान परिषदेतील काही सदस्यांनी झुम अॅपवर विधान परिषदेचे अधिवेशन घेण्याची मागणी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …
Read More »गुजरात सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची योगायोगाने बदली न्यायाधीशांच्या बदलांतील तथाकथीत योगायोग चिंता वाढवणारा : सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी मागील सहा वर्षात अनेक न्यायाधीशांच्या तडकफडकी बदल्या झाल्या. यातील बहुतांश न्यायाधीश हे अत्यंत संवेदनशील प्रकरणे हाताळत होते किंवा त्यांनी दिलेले निवाडे आणि टिप्पण्या या भाजपशासित सरकारच्या विरोधात होत्या. मात्र या बदल्या रुटीन असल्याची सांगण्यात आले. परंतु हा तथाकथीत वाढलेला योगायोग चिंताजनक असून दोनच दिवसापूर्वी ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या …
Read More »एकूण संख्या ६० हजाराच्या तर अॅक्टीव रूग्णांची ४० हजाराच्या काटावर राज्यात २५०० वर नवे रूग्ण,तर मृतकांची संख्या १९८२ वर
मुंबई: प्रतिनिधी आज ८५ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतकांची संख्या २ हजार संख्येच्या अगदी काटावर येवून ठेपली असून ही संख्या १९८२ वर पोहोचली आहे. तर आज २५९८ नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५९ हजार ५४६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३९ हजार ९३९ वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य …
Read More »मंत्री राऊत अधिकाऱ्यांना म्हणाले, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा ; अन्यथा कारवाई विदर्भ- मराठवाड्याच्या आढावा बैठकीत दिला इशारा
नागपूर : प्रतिनिधी वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा. तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले. …
Read More »६ महिने पूर्ण करत ठाकरे सरकारने कमावलं एक बिरूद, “लढवय्या” भाजपाचा दावा फोल ठरला
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात औट घटकेचे फडणवीस सरकार जावून नवे ठाकरे अर्थात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापनपन्न झाले. त्यास आज बरोबर ६ महिने पूर्ण होत असून या ६ महिन्यापैकी जवळपास तीन महिने कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यात जात असल्याने याचा अपवाद वगळता …
Read More »‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या संकटामुळे सर्वात जास्त अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरीत मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी चालवलेल्या ऑनलाईन मोहीम ‘स्पीक अप इंडिया’ला महाराष्ट्रातही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोहचला असून झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि …
Read More »“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर
मुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …
Read More »
Marathi e-Batmya