साताराः प्रतिनिधी पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गयाराम आणि गयारामाच्या तयारीत असलेल्यांना लगावत राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते …
Read More »१५१ तालुक्यातील १० वी- १२ वीच्या विद्यार्थ्यांची “संपूर्ण परीक्षा फी” माफ दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या खात्यावर थेट होणार जमा शालेय मंत्री अॅड. आशिष शेलार यांचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या १५१ तालुक्यातील १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करताना यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. तसेच ही प्रतिपूर्ती RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी असा निर्णय शालेय …
Read More »अशोक चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणतात शिबीरे घ्या पीक विम्याच्या तक्रार निवारणासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून पीक विमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. पिकांचे प्रचंड …
Read More »आधी नेत्यांना नाही तर त्यांच्या मुलांना पक्षात घेतलं नेते आपोआप आले मुख्यमंत्री फडणवीस यांचा पवारांच्या वक्तव्यावर खुलासा
मुंबईः प्रतिनिधी आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवू, पुन्हा युतीचंच सरकार येणार, आता फक्त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे. धाक किंवा प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने …
Read More »भीम आर्मीच्या आंदोलनामुळे आदीत्य म्हणतात जनआर्शीवाद यात्रा अराजकिय निवडणूकीत पडसाद नको म्हणून शिवसेना 'बॅकफूटवर'
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रेचे आय़ोजन करत प्रत्येक जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या आदीत्य ठाकरे यांच्या विरोधात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यामुळे शिवसेनेने बँकफूटवर येत ही यात्राच अराजकिय असल्याची …
Read More »राजकिय भाषण केल्यास आदीत्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा नोंदवा आदीत्य ठाकरेंना अटकाव करणा-या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक
सोलापूर: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात कार्यक्रमासाठी येत असलेले युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांना अटकाव करण्यासाठी महाविद्यालयासमोर आलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनासाठी जमा झाले. मात्र पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविद्यालयासारख्या शैक्षणिक क्षेत्रात सर्व जातीचे, धर्माचे व वेगवेगळ्या संघटनेचे …
Read More »अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »संचालकाविनाच सांस्कृतिक संचालनालयाचे कामकाज चालणार चार महिने झाले तरी संचालक मिळेना
मुंबई : प्रतिनिधी संस्कृतीचे वैभव असणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे “संचालक” पद किमान चार महिने तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा अनेक योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. सध्या संचालक पदाचा पदभार सह संचालक यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ऑक्टोबर २०१८ रोजी श्रीमती स्वाती काळे ह्या सांस्कृतिक …
Read More »महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनो आधी पाच वर्षाचा हिशोब द्या जनतेला फसविल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका …
Read More »“सुपर ३०” हिंदी चित्रपट राज्यात टँक्स फ्री राज्य वस्तू व सेवाकरात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी बिहारमधील प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंदकुमार यांच्या कार्यावर आधारित “सुपर ३०” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आनंदकुमार यांनी “रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमेटिक्स्”च्या माध्यमातून बिहारमधील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांना जे.ई.ई. व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. …
Read More »
Marathi e-Batmya