ग्रामीण भागात शेतजमिनी हिस्से वाटणी ही भूमी अभिलेख आणि शेतकऱ्यांसाठी डोकेदुकी असते. तसेच भाविकीतील किंवा एकाच कुटुंबातील हिस्सेवाटप आदी प्रश्नी शेतकऱ्यांचे हजारो पैसे वाया जात असल्याचे आणि त्याचे पर्यावसन वादात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतीची हिस्से वाटप मोजणी आता अवघ्या २०० रूपयात करण्याचा निर्णय घेत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री …
Read More »नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दिल्ली न्यायालयाचे ईडी चौकशीवर प्रश्नचिन्ह राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या संदर्भातील पुराव्याबाबत शंका
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या तक्रारीची दखल घ्यावी की नाही यावर बुधवारी दिल्लीतील एका न्यायालयाने युक्तिवाद सुरू केला. ईडीच्या मते, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या ₹२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेच्या कथित फसवणुकीतून मिळालेल्या ‘गुन्ह्यातून मिळालेल्या …
Read More »वक्फ कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज काय झाले? उद्या पुन्हा सुनावणी होणार केंद्र सरकारमध्ये वक्फ ही इस्लामिक संकल्पना असली तरी धार्मिक भाग नाही
केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की वक्फ ही इस्लामिक संकल्पना असली तरी ती इस्लामचा अत्यावश्यक भाग नाही आणि वक्फ बोर्ड धर्मनिरपेक्ष कार्ये पार पाडतात. त्यामुळे वक्फ बोर्डात गैर-मुस्लिमांचा समावेश करण्यास परवानगी आहे, असा युक्तिवाद केला. केंद्र सरकारचे दुसरे सर्वात वरिष्ठ कायदा अधिकारी, सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी भारताचे …
Read More »न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात एफआयआऱ दाखल करण्याच सर्वोच्च न्यायालयाचा नकार चौकशी अहवाल पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयास पाठविले असल्याचे कारण केले पुढे
दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आढळलेल्या बेहिशेबी रोख रकमेप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश ए. एस. ओका आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने असे निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या घटनेची …
Read More »पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय
पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू
देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिर गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, …महाराष्ट्र कुठे जातोय? हगवणे कुटुंबातील हुंडाबळी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही; कारण आपण सगळे भारतीय एक आहोत. आज दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई ही कोणतीही वैयक्तिक किंवा राजकीय लढाई नाही, तर ती आपल्या देशाच्या एकात्मतेसाठीची सामूहिक लढाई असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सुप्रिया सुळे …
Read More »कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्य़ा लघुकथा हार्ट लॅम्प पुस्तकास बुकर पुरस्कार बानू मुश्ताक आणि अनुवादिका दीपा भास्थी यांना पुरस्कार जाहिर
भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादिका दीपा भास्थी यांना मंगळवारी “हार्ट लॅम्प” या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. हा संग्रह ३० वर्षांहून अधिक काळ लिहिलेल्या १२ लघुकथांचा संग्रह आहे आणि दक्षिण भारतातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचे आणि संघर्षांचे वर्णन करतो. लंडनच्या टेट मॉडर्न येथे झालेल्या एका समारंभात पाच सदस्यीय मतदान पॅनेलचे …
Read More »केंद्र सरकारने निधी रोखल्याप्रकरणी तामीळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका एनईपी आणि पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणी करत नाही म्हणून हजारो कोटींचा निधी रोखला
तामिळनाडू राज्याने सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या विरोधात खटला दाखल केला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारवर समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ₹२००० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या महत्त्वाच्या शिक्षण निधीचा वार्षिक निधीचा वाटा रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ वकील पी. विल्सन यांनी प्रतिनिधित्व केलेल्या आणि अधिवक्ता रिचर्डसन विल्सन आणि अपूर्व मल्होत्रा यांनी तयार केलेल्या या …
Read More »
Marathi e-Batmya