सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१७ जानेवारी) सांगितले की ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीसी) दाखल केलेल्या प्रकरणांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी २८ फेब्रुवारीपासून घेणार आहे. पाच वेगवेगळ्या तथ्यात्मक पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध सूचीबद्ध केलेल्या ५ प्रकरणांमध्ये, सामान्य मुद्दा असा आहे की पीसी कायद्याअंतर्गत पूर्व मंजुरी …
Read More »आरजी कर रूग्णालयातील डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संजय रॉय दोषी पण चार्जशिट दाखल केले नसल्याने जामीन मंजूर
कोलकाता येथील सत्र न्यायालयाने आरजी कर बलात्कार-हत्येप्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शिक्षेची सुनावणी सोमवारी होणार आहे. सुनावणीत आरोपी संजय रॉयने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत सांगितले की, या घटनेत सहभागी नव्हता. न्यायालयाने रॉयला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येसाठी दोषी ठरवले. न्यायालयाने याप्रकरणी संजय रॉयचा सहभाग असल्याचे दर्शविणाऱ्या …
Read More »केईएम रुग्णालयाला १०० वर्षे पूर्णः वर्ष समाज उपयोगी ठरावे सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम
केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून संस्थेचे हे वर्ष समाज उपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाही… काय अवस्था? अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका
महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच …
Read More »अंजली दमानिया यांच्याकडून मुंडे-कराड चा आणखी एक पुरावाः केली राजीनाम्याची मागणी राख विक्रीच्या कंपनीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भागिदारी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आणि परळी तालुक्यातील दहशतीवरून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कथित आर्थिक संबध आणि वाल्मिक कराडच्या पाठिशी धनंजय मुंडेच असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक पुरावा दाखवत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा …
Read More »गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची समिती
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनलय अंतर्गत ६२ …
Read More »राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात छगन भुजबळ आले, प्रफुल पटेल म्हणाले, ते ज्येष्ठ नेते ते आमच्या कुटुंबातील टोकाची नाराजी नाही
विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षात नाराजी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने बाहेर आली. त्यातच छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून स्वतः अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याकडून नाराजी दूर करण्यासंदर्भात अद्याप कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगितले जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशासाठी नाराज छगन भुजबळ येणार की नाही अशी चर्चा …
Read More »एचएसबीसी बँकेला शाखा उघडण्यास आरबीआयची मंजूरी एचएसबीसी बँकेला बनायचेय भारतीयांची बँक
नवीन शाखा त्यांच्या वाढत्या संपत्तीच्या पूलसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरांमध्ये असतील, ज्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संपत्ती आणि बँकिंग गरजा असलेल्या श्रीमंत, उच्च निव्वळ संपत्ती आणि अति-उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या ग्राहकांसाठी अतिरिक्त संपर्कबिंदू म्हणून काम करतील, असे त्यात म्हटले आहे. “भारत एचएसबीसीसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि भारतातील संपत्ती हा एक केंद्रबिंदू …
Read More »टिकटॉकवर बंदीचा अमेरिकन न्यायालयाचा निर्णयः ट्रम्प-शी यांच्यात चर्चा सरकारच्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पदभार स्वीकारण्याच्या काही दिवस आधी, शुक्रवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी टिकटॉक, व्यापार आणि तैवान सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी आव्हाने असूनही अमेरिका-चीन संबंधांच्या भविष्याबद्दल आशावाद व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कॉलचे वर्णन “खूप चांगले” असे केले आणि …
Read More »सरकारी कर्मचारी आता या नव्या रेल्वे गाड्यांमधून अधिकृतरित्या प्रवास करू शकणार तेजस वंदे, भारत आणि हमसफर गाड्यांनी प्रवास करणे अधिकृत होणार
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (LTC) उद्देशांसाठी तेजस, वंदे भारत आणि हमसफर गाड्या वापरण्यास अधिकृत केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता एकूण ३८५ गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे, ज्यामध्ये १३६ वंदे भारत, ९७ हमसफर आणि ८ तेजस एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. यापूर्वी, त्यांना राजधानी, शताब्दी आणि दुरांतो मालिकेतील १४४ …
Read More »
Marathi e-Batmya