Editor

नव्या अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला नव्या संधीच्या आशा वैद्यकीय उपकरणाच्या व्यवसायाला नव्या संधीची अपेक्षा

भारत २०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्पाजवळ येत असताना, आरोग्यसेवा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान उद्योग अशा सुधारणांसाठी जोर देत आहेत. ज्यामुळे या क्षेत्राचे आकार बदलू शकतील आणि देशाला नवोपक्रम आणि सुलभतेमध्ये जागतिक आघाडीवर स्थान मिळेल. स्थानिक उत्पादन आणि ग्रामीण आरोग्यसेवेला चालना देण्यासाठी धोरणांसह, वैद्यकीय उपकरणांवरील आयात शुल्क कमी करावे आणि प्रगत तंत्रज्ञानात संशोधन …

Read More »

उच्च न्यायालयाचे एचडीएफसी बँकेला आदेश, सीसीटीव्ही फुटेज सादर करा न्यायाधीश धनंजय निकम लाच प्रकरणी न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच सातारा येथील एचडीएफसी बँकेच्या एका शाखेला ९ डिसेंबर २०२४ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांना [धनंजय निकम विरुद्ध महाराष्ट्र राज्य] देण्याचे आदेश दिले. न्यायालयाला सांगण्यात आले की, हे फुटेज सरकारी वकिलांच्या दाव्याला समर्थन देऊ शकते की आरोपी न्यायाधीश आणि तक्रारदार एचडीएफसी बँकेकडे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थित योजनेवर चर्चा

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी …

Read More »

स्वामित्व योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सनद वितरणाचा शुमारंभ महाराष्ट्रात राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वितरण

स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांशा पुर्ण करत आहे. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्‍या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

बी एस येडीयुरप्पा यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २८ फेब्रुवारीला सुनावणी फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेपासून सुनावणीला सुरुवात

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१७ जानेवारी) सांगितले की ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीसी) दाखल केलेल्या प्रकरणांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी २८ फेब्रुवारीपासून घेणार आहे. पाच वेगवेगळ्या तथ्यात्मक पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध सूचीबद्ध केलेल्या ५ प्रकरणांमध्ये, सामान्य मुद्दा असा आहे की पीसी कायद्याअंतर्गत पूर्व मंजुरी …

Read More »

आरजी कर रूग्णालयातील डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संजय रॉय दोषी पण चार्जशिट दाखल केले नसल्याने जामीन मंजूर

कोलकाता येथील सत्र न्यायालयाने आरजी कर बलात्कार-हत्येप्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शिक्षेची सुनावणी सोमवारी होणार आहे. सुनावणीत आरोपी संजय रॉयने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत सांगितले की, या घटनेत सहभागी नव्हता. न्यायालयाने रॉयला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येसाठी दोषी ठरवले. न्यायालयाने याप्रकरणी संजय रॉयचा सहभाग असल्याचे दर्शविणाऱ्या …

Read More »

केईएम रुग्णालयाला १०० वर्षे पूर्णः वर्ष समाज उपयोगी ठरावे सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून संस्थेचे हे वर्ष समाज उपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाही… काय अवस्था? अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच …

Read More »

अंजली दमानिया यांच्याकडून मुंडे-कराड चा आणखी एक पुरावाः केली राजीनाम्याची मागणी राख विक्रीच्या कंपनीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भागिदारी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आणि परळी तालुक्यातील दहशतीवरून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कथित आर्थिक संबध आणि वाल्मिक कराडच्या पाठिशी धनंजय मुंडेच असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक पुरावा दाखवत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा …

Read More »

गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची समिती

गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनलय अंतर्गत ६२ …

Read More »