Breaking News

आषाढी वारीसाठी पंढरपूरला ‘या’ जिल्ह्यातून विशेष एसटी गाड्या आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या - परिवहन मंत्री अनिल परब

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. ६ ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी ८ जुलै …

Read More »

मंत्रालय मधील कर्मचाऱ्यांना, सहायक कक्ष अधिकारी होण्याची संधी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

मंत्रालय मधील विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षेची पात्रता आणि अभ्यासक्रमाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यासाठी पात्रता :- (अ) परीक्षेला बसण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने (i) लिपिक-टंकलेखक पदावरील नियमित सेवेची पाच वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. (ii) लिपिक-टंकलेखक …

Read More »

नाना पटोलेनंतर आता छगन भुजबळ यांचे पत्र, तर फटका ओबीसींना बसू शकतो आडनावावरून जात ठरविण्याच्या प्रश्नावर भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आडनावांवरुन कोण ओबीसी आहे आणि कोण नाही हे ठरवलं जातंय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित या मुद्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा …

Read More »

खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे लवकर शुभमंगल होवो… भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. बोंडे यांची मागणी

राज्यसभेवरील नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली की, आदित्य ठाकरे यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. ते माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. विदर्भातील सूनबाई असेल तर चांगले होईल अशी आगळीवेगळी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे… तुळापूर, वढू (बु.) येथील स्मारकांबाबत शिखर समितीची बैठक

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्येत महाराष्ट्र सदन… मनसेवर अप्रत्यक्ष टीका

बहुचर्चित शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा दुसऱ्यांदा ठरल्याप्रमाणे आज पडला. यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ५ जून रोजीचा अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहिर कऱण्यात आला. मात्र भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधानंतर राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला. …

Read More »

गोपीचंद पडळकर यांचे परिवहन मंत्री परब यांना पत्र, तर उद्रेक होणार नाही… कोविड काळातील कामाचा एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप प्रोत्साहन भत्ता नाहीच

कोविडच्या पहिल्या लाटे दरम्यान संपूर्ण देश आणि देशातील कामकाज ठप्प होते. त्यावेळी राज्य सरकारच्या विविध कामकाजासाठी एसटी महामंडळातील विविध कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत त्यांच्याकडून विशेष सेवा बजावून घेण्यात आली. त्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनीही विशेषतः ड्रायव्हरनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावली. या सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या सेवेबद्दल प्रोत्साहन …

Read More »

राज्यात या नवीन ठिकाणांचा संवर्धन, अभयारण्ये आणि जैविविधता स्थळांचा समावेश पर्यावरणस्नेही विकासाचा आग्रह कायम- मुख्यमंत्री

राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य …

Read More »

अजित पवार यांच्या भाषणाला परवानगी नाकारल्यानंतर देहू संस्थानचे अध्यक्ष म्हणाले… आम्हाला दिल्लीवरून फक्त नावे विचारण्यात आली

देहू येथील जगद्गुरू संत तुकारामम हाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही तर… राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना भविष्यकालीन योजनांचा सुतोवाच

पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. …

Read More »