Breaking News

दिल्ली पोलिसांना चायना बॉर्डरवर पाठवा शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

गाझीपूर (उ.प्र): प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी करत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दिल्ली पोलिसांना चायना बॉर्डरवर पाठवा असा टोलाही त्यांनी लगावला. दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेते …

Read More »

‘पोक्रा’ अंतर्गत गावांची माहिती आता एका क्लिकवर! कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑनलाईन ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली असून, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या …

Read More »

कोरोना : नागपूर, मुंबई, पुणे वगळता कोल्हापूरसह बहुतांष ठिकाणी ० मृत्यू १ हजार ९४८ नवे बाधित, ३ हजार २८९ बरे झाले तर २७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुंबई-ठाणे, पुणे, नाशिक, अकोला, लातूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या ८ मंडळामध्ये ठाणे मंडळातील मुंबईत फक्त ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबई महानगरातील ११ महापालिका आणि जिल्ह्यामध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोल्हापूर मंडळातील ६ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू झाला नाही. पुणे विभागत फक्त पुणे शहर …

Read More »

समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल मा. मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आपण अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली. कोरोनाच्या महासाथीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आणि देशाच्या …

Read More »

…तर अर्थसंकल्पाने जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले अर्थमंत्री अजित पवारांची टीका

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिले असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडल्याची …

Read More »

निवडणुकीचा जाहीरनामा, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र ! शेतकरी, कष्टकरी, युवक, नोकरदार व मध्यमवर्गाचीही घोर निराशा- बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून ज्या राज्यात निवडणुका आहेत त्याच राज्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची नवी पद्धत समोर आली आहे. ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या राज्यात काही द्यायचेच नाही हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे या अर्थसंकल्पातून समोर आले आहे. या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनामा बनवले आहे. अर्थमंत्र्यांचे आजचे …

Read More »

जाणून घ्या काय स्वस्त होणार? काय महागणार? तर ज्येष्ठ नागरीकांना करातून सूट-केद्रिय अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी आयात इलेक्ट्रॉनिक वस्तुंवरील कस्टम ड्युटीमध्यें वाढ करण्यात आल्याने मोबाईल, चार्जर महाग होणार आहे. तर मेड इन इंडिया या संकल्पनेला चालना देण्यासाठी देशातंर्गत तयार झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागांवरही कस्टम ड्युटी १५ टक्क्याने वाढविल्याने वाहनांचे स्पेअर पार्ट महागणार आहेत. याशिवाय अल्कोहोलिक बिव्हरेजवर …

Read More »

आत्मनिर्भर अर्थसंकल्पातील जाणून घ्या महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या या घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी आरोग्य क्षेत्र- – नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद – प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणीसाठी तरतूद – १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा – आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींच्या निधीची तरतूद – कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद …

Read More »

आत्मनिर्भर अर्थसंकल्प : सरकारी कंपन्या विक्रीला- जनतेच्या आरोग्यासाठी नव्या योजना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना काळातील वाईट परिस्थितीनंतर अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले, मात्र आत्मनिर्भर अर्थसंकल्पाच्या नावाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिन विक्रीतून लाखो कोटी रूपये उभारण्यात येणार असून यापाठोपाठ एलआयसी विमा कंपनीच्या विक्रीच्यादृष्टीने त्याचा आयपीओ बाजारात आणला जाणार आहे.  तसेच विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची सद्दी …

Read More »

कोरोना : जाणून घ्या कोणत्या वयोगटातील सर्वाधिक बाधित रूग्ण २ हजार ५८५ नवे बाधित, १ हजार ६७० बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळण्यास तब्बल ११ महिने झाले. या ११ महिन्यात सर्वाधिक बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींचे असून त्यानंतर ४१ ते ५० वयोगट, २१ ते ३० वयोगटातील आणि ५१ ते ६० वयोगटातील आणि शेवटी ६१ ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. …

Read More »