Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंनी धनगर समाजाला दिले हे आश्वासन धनगर समाज शिष्टमंडळाशी विविध मुद्यांवर चर्चा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला. धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची शुक्रवारी ( दि.९) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे …

Read More »

फडणवीस सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकारमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी देशाचा गुन्हे दर (Crime rate) वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हे दर मात्र २०१८-१९ च्या तुलनेत तोच राहिला असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हे दर केरळ, तेलंगाणा, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचा आहे. तसेच राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दर हा वाढला असून २०१८ मध्ये जो ४१.४१ होता …

Read More »

एमपीएससीची परिक्षा पुन्हा ढकलली पुढे पण वयोमर्यादा तीच राहणार नव्या तारखेस होणाऱ्या परीक्षेस सध्याचे पात्र उमेदवार बसू शकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना …

Read More »

कोरोना: एकूण बाधित पुणे नंतर मुंबई आणि ठाणेतही २ लाखापार; एकूण १५ लाख रूग्ण १२ हजार १३४ नवे बाधित, १७ हजार ३२३ बरे झाले तर ३०२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत असली तरी दुसऱ्याबाजूला एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या वगळण्यात आलेली नसल्याने एकूण बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या पुणे जिल्ह्याची असून …

Read More »

राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना वेतन सुसुत्रीकरण लागू राज्यातील २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना होणार लाभ- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसुत्रीकरण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याचा राज्यातील सुमारे २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ५९७ संवर्गातील पदांचे एकत्रीकरण करून त्याचे ६९ संवर्गात रुपांतर करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनाचा लाभ १ …

Read More »

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे १२ ऑक्टोंबरला राज्यभर निदर्शने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या  वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत , अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक …

Read More »

कोरोना: ७४ लाख तपासण्या आतापर्यत पूर्ण तर घरगुती विलगीकरणात २२ लाख ८४ हजार १३ हजार ३९५ नवे बाधित, १५ हजार ५७५ बरे झाले तर ३५८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मागील सात महिने ८ दिवसांमध्ये राज्यात ७४ लाख तपासण्या झालेल्या आहेत. सरासरी ३० ते ३५ हजार चाचण्या राज्यात दिवसाकाठी होत आहेत. या चाचण्यामुळे आतापर्यंत १४ लाख ९३ हजार अर्थात १५ लाख बाधित रूग्णांची संख्या आढळून आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत …

Read More »

शाळा १५ ऑक्टोंबर नव्हे तर दिवाळीनंतरच; अहवाल सादर करा ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी अनलॉक-५ अंतर्गत देशभरातील सर्व शाळा १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारवर सोपविले. मात्र राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार अद्यापही उत्सुक नसून साधारणत: दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार करत असून याअनुषंगाने ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेवून त्यासंदर्भातील अहवाल …

Read More »

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होतेय मात्र घरी जाणारे जास्तच १४ हजार ५७८ नवे बाधित, १६ हजार ७१५ बरे झाले तर ३५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी जवळपास आठवडाभर राज्यातील दैंनदिन बाधित रूग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर पुन्हा एकदा  बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आज दिसून आले. यापैकी मागील तीन ते चार दिवसापासून मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या २ हजाराच्या आत नोंदविली जात असे. मात्र आज त्यात तब्बल १ हजार रूग्णांची वाढ होत २८०० हून अधिक रूग्ण …

Read More »

आदित्य ठाकरेंनी शब्द पाळला, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, लॉजच्या परवानग्यांमध्ये केली घट हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी परवानग्यांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई: प्रतिनिधी राज्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रात येणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, लॉज सुरु करण्यास लागणाऱ्या परवानग्यांच्यादृष्टीने क्रांतिकारी निर्णय पर्यटन विभागाने घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी ७० परवानग्यांऐवजी आता १० परवानग्या तसेच ९ स्वयं प्रमाणपत्रे लागतील. यासंदर्भात साधारत: दोन आठवड्यापूर्वी पर्यटन …

Read More »