आज १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, पंतप्रधान मोदी यांना जातीय जणगणना थंड बस्त्यात ठेवायचीय निवडूक काळात महिला आरक्षण कायद्यात दुरुस्तीही करायचीय
काँग्रेसने रविवारी आरोप केला की, सरकारला जात जनगणना ‘थंड’ ठेवायची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची ‘दिशाभूल’ करण्याच्या अजेंड्याने महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करू इच्छितात. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला की, ‘जात जनगणनेचे निकाल काही वर्षांसाठी उपलब्ध होणार नाहीत’ या कारणास्तव मोदी सरकार कलम ३३४-अ मध्ये दुरुस्ती करू …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजमधून जाणाऱ्या-येणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरु इराणला टोल देणाऱ्या जहाजांची तपासणी करण्याचा दिला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका-इराण चर्चांमधून कोणताही करार न झाल्याने, वॉशिंग्टन लवकरच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करण्याचा किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरू करेल. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “तात्काळ प्रभावाने, अमेरिकेचे नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करण्याचा किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही आणि सर्व जहाजांना नाकेबंदी करण्याची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गारे पालमा कोळसा खाण प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वाचा * पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे आगमन, * महानिर्मितीला दीर्घघकालीन व स्थिर कोळसा पुरवठा
राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे कोळशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पालमा सेक्टर -2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या …
Read More »आदिती तटकरे यांचे आवाहन, ईकेवायसीच्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. पुढे बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संगीतविश्वावर ८ दशके अधिराज्य गाजवणारा चिरतरुण आवाज हरपला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची श्रद्धांजली
आपल्या जादुई आवाजाने तब्बल ८ दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला असून प्रत्येक वयातील व्यक्तीला आवडतील अशी गाणी त्यांनी गायली आहेत. आशाताईंच्या निधनाने जगाला भुरळ घालणारा चिरतरुण आवाज हरपला …
Read More »मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर …
Read More »आशा भोसले यांचा स्वर कायमचा शांत, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शोक उद्या होणार अंत्यसंस्कार
ख्यातनाम आयकॉनिक पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते’ …
Read More »इराण आणि अमेरिका दरम्यानची पाकिस्तानातील चर्चा ठरली अखेर अपयशी २१ तास मॅरेथॉन चर्चा कोणत्याही कराराविना संपली
इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या चर्चेचा उद्देश दोन आठवड्यांच्या नाजूक शस्त्रसंधीला कायमस्वरूपी बनवणे हा होता. त्याऐवजी, सुमारे २१ तास चाललेली ही मॅरेथॉन चर्चा युद्ध करणाऱ्या पक्षांमध्ये कोणताही करार न होता संपली. पाकिस्तानच्या राजधानीत झालेली ही चर्चा, १९७९ च्या इस्लामिक क्रांती आणि तेहरानमधील अमेरिकन दूतावास संकटानंतर इराण आणि अमेरिका …
Read More »पंतप्रधान मोदी यांची आयकॉनिक पार्श्वगायिका आशाताई भोसले यांना श्रद्धांजली आशा भोसले यांची गाणी अब्जावधी भारतीयांच्या जीवनात कायम वाजत राहिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालेल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची गाणी ‘अब्जावधी भारतीयांच्या जीवनात कायम वाजत राहतील.’ भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya