तीन तलाक कायद्याशी संलग्न लक्षवेधीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारला घेरले विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांचा सवाल, कोणत्या मेरिटच्या आधारे लक्षवेधी स्विकारली

देशातील मुस्लिम समाजाची मते मिळविण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआ सरकारने तीन तलाक प्रकरणी नवा कायदा आणत आता फोन, समाज माध्यमांचा वापर करत करत पत्नीला तलाक देणे गुन्हा ठरविण्यात आला. केंद्राने हा कायदा लागू केल्याने त्याच्या अंमलबजावणीचा विषय फक्त राज्याच्या अखत्यारित येतो. पण नाशिक मध्ये तीन वेगवेगळ्या मुस्लिम महिलांना त्यांच्या पतीने घटस्फोट देत दुसरा विवाह केल्याचा मुद्दा नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. त्यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ही लक्षवेधी याचिका स्विकारली असा सवाल करत राज्य सरकारला चांगलेच घेरले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात तीन तलाकचा विषय असल्याने त्यावर चर्चा करता येत असल्याचे सांगत त्यामुळेच या विषयावर चर्चा करण्यासाठीच ही लक्षवेधी स्विकारल्याचे सांगितले. पण ही लक्षवेधी मेरिटमध्ये बसत नसल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी पुन्हा उपस्थित केला, तसेच ही लक्षवेधी उपस्थित करणाऱ्याच्या बाबत आमच्या मनात कोणताही विरोध नाही. पण ही लक्षवेधी सूचना मेरिटनुसार नसल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकारने केलेल्या कायद्यावर राज्याच्या विधानसभेत चर्चा करता येत नसल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांना लक्षवेधी मांडण्यास परवानगी दिली. त्यावर देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील एका महिलेस तीच्या पतीने समाज माध्यमांचा वापर करत तलाक दिला. परंतु तीला त्याच्यापासून झालेल्या मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिला असून ती रहात असलेल्या घराचे हप्तेही तिला भरावे लागत असल्याने त्या महिलेला कठीण आर्थिक परिस्थितीतून जावे लागत आहे. त्याचबरोबर अन्य दोन मुस्लिम महिलांनाही तलाक अर्थात घटस्फोट दिला असून त्या महिलांनाही अशाच पद्धतीतून जावे लागत असल्याचे सांगत यासंदर्भात नाशिक येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यासंदर्भात राज्य सरकारने पावले उचलावित किवा ठोस निर्णय घ्यावेत अशी भूमिका मांडली. तसेच पाकिस्तान मध्येही बहुपत्नीत्व पध्दत रोखण्यासाठी एक आर्बिटरी प्राधिकरणाची व्यवस्था आहे. तेथेही अशा पद्धतीचे गुन्हे घडले तर तेथील निर्णय घेण्याचे अधिकारी आर्बिटरी प्राधिकरणाला असल्याचे सांगितले.

त्यावर राष्ट्रवादीच्या अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक-शेख यांनी हरकत घेत म्हणाल्या की, या लक्षवेधी सूचना का मांडण्यात आली यावरून मला प्रश्न पडला आहे की, ही लक्षवेधी सूचना नेमकी मुस्लिम धर्मियात बहुपत्नीत्व धोरण स्विकारले आहे म्हणून आहे की, फक्त मुस्लिम महिलांना घटस्फोट दिला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे आणि तिसरा म्हणजे, घटस्फोटाचे आणि बहुपत्नीत्वाची प्रकरणे फक्त मुस्लिम समाजातच होतात का अन्य धर्मियांच्यात अशा पद्धतीचे घटस्फोटाची प्रकरणे होत नाहीत का असे तीन प्रश्न मला पडले असल्याचे सांगत बहुपत्नीत्व प्रकरणी पाकिस्तानचा संदर्भ आपल्याकडे द्यायला नको असे सांगत तो वगळून सरकारला वाटत असले तर त्यावर चर्चा करावी आणि यावर अध्यक्षांनी योग्य ते प्रकाश टाकावा अशी मागणी केली.

सना मलिक शेख या आपला आक्षेप नोंदविताना भाजपाच्या इतर महिला आणि पुरुष आमदारांकडून अडथळे आणत सना मलिक शेख यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, त्रिपल तलाक प्रकरणी यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र त्यावर अद्याप पुढील कारवाई सुरु असल्याचे सांगितले. मात्र या प्रकरणी एक ठोस नियमावली तयार करावी लागणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, सना मलिक शेख यांनी त्रिपल तलाक प्रश्नी प्रश्नी मांडलेली रुपरेखा महत्वाची असून त्यास त्या सकारात्मक पध्दतीने सूचना असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *