केंद्रीय राज्यमंत्री तथा एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः पोलिस स्टेशनला जात पोलिसांत जाऊन तक्रार नोंदविली. मात्र त्यानंतर थोडी हालचाल होत एकाला अटक करण्यात आले. मात्र अद्यापही तीन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या …
Read More »बुरा ना मानो….म्हणत चित्रातला वाघ मांजरीनीपेक्षा भित्रा, सुषमा अंधारे यांची टीका शिंदे गटातील फुटीर नेत्यांवर टीका करत भाजपा नेत्यांवरही साधला निशाणा
आज होळीनंतरचा धुळवडीचा सण या सणाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही या धुळवडीचा आनंद कुटुंबिय, कार्यकर्त्यांसह साजरा करण्यास सुरुवात केली. तर काही नेत्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांवर किंवा पक्षावर राजकिय टीके-आरोपांची राड टाकत राजकीय धुळवड साजरी केली. यात शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांवर राडीचे शाब्दीक फटकारे ओढत …
Read More »होळी उत्सवाच्या दरम्यान राजापूरात घडले काय? आ निलेश राणे यांनी केले आवाहन मस्जिदीचे गेट तोडून काही समाजकंटकाकडून सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न
कोकणातील शिमगा अर्थात होळी सणाच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच स्थानिक ग्रामदैवताच्या पालक्याही फिरवत त्याची मिळवणूकही काढली जाते. कार रात्री शिमगा उत्सवाच्या निमित्ताने ग्रामदेवतेचे पालखीच्या मिरवणूकीच्या रस्त्यावर असलेल्या एका मस्जिदीतचे बंद असललेले गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, युवा शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा सरकारने घेतलेला बळी नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा
राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या …
Read More »पानिपत येथे “मराठा शौर्य स्मारक” उभारण्याचा शासन निर्णय जारी मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती
पानिपतच्या “काला अंब” परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. मंत्री ॲड. शेलार म्हणले की, पानिपतच्या तिसऱ्या लढाईला ३५४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १४ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, चामड्याच्या वस्तूंवरील अन्यायकारक जीएसटी तात्काळ कमी करा लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली मागणी
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या महागाई व नोटबंदीने लघु, छोटे व मध्यम व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, त्यातच जीएसटीमुळे उरला सुरला उद्योगही शेवटच्या घटका मोजत आहे. सर्वच वस्तूवर जीएसटी लावून सरकार छोटे उद्योग देशोधडीला लावत आहे. चामड्याच्या वस्तूंवर जीएसटी वाढवून भाजपा सरकाने या उद्योगाला मोठ्या संकटात टाकले आहे. सरकारने हा वाढवलेला जीएसटी तात्काळ …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? मागील ११ वर्षात देशात गरिब व श्रीमंत दरी वाढली; भाजपा सरकारचा विकास फक्त मुठभर श्रीमंतांसाठी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, निविदेत घोटाळा असल्याचे लक्षात येताच रद्द, चौकशी करणार एका महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल
एसटी महामंडळाने मध्यंतरी एसटी बसेस भाड्याने घेण्याबाबतचा निर्णय घेतला. तसेच त्यासंदर्भातील जी निविदा काढण्यात आली आणि त्यासंदर्भातील वर्क ऑर्डरचे आदेश मागीलवेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच ही निविदा प्रक्रिया नियमानुसार असल्याचे सभागृहात सांगितले. मात्र आता विद्यमान मुख्यमंत्री त्यासंदर्भात स्थगिती आदेश देत आहेत असा मुद्दा विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी …
Read More »चंद्रकांत पाटील यांची माहिती, सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची भरती लवकरच विधान परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, उच्च …
Read More »शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार
आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक …
Read More »
Marathi e-Batmya