केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी डॉक्टरांना कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या भीषण बलात्कार आणि हत्येविरोधात डॉक्टरांनी पुकारलेल्या देशव्यापी संप मागे घेण्यास सांगितले. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षा उपाय प्रस्तावित करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल असे आश्वासन दिले. ही समिती, केंद्राप्रमाणे, राज्य सरकारांसह सर्व संबंधित आरोग्य सेवकांचे म्हणणे ऐकूण घेईल आणि …
Read More »वादग्रस्त रामगिरी महाराजांची भेट घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता सलोखा राखण्याचे आवाहन राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखा
दोन दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरु महम्मंद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रामगिरी महाराज यांची भेट घेत त्यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थितही राहिले. तर …
Read More »मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा
महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुडा घोटाळा चौकशीस राज्यपालांची मंजूरी राज्यपाल भवनाचा वापर राजकारणासाठी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीवरून जमिन घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपाने करत याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत होती. तसेच त्या विषयीचा प्रस्ताव कर्नाटकच्या राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता. त्याच अखेर राज्यपालांनी या कथित जमिन घोटाळ्याची चौकशी करण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) द्वारे जमीन वाटपाच्या …
Read More »शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे
बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …
Read More »उमेद अभियान बचतगटातील महिला मुख्यमंत्र्यांना पाठविणार एक कोटी राख्या विविध योजना आणल्याबद्दल महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता
राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरीत करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून …
Read More »अतुल लोंढे यांचा इशारा, MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी, तारखा बदला अन्यथा… MPSC च्या आडमुठ्या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.
MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे. १८ व २५ ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. MPSC एमपीएससीने परिक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन दोन …
Read More »शरद पवार यांची टीका, केंद्र सरकारने विरोधी पक्षनेते पदाचा आदर… राहुल गांधींना बसविले मागच्या रांगेत
काल स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बसण्यासाठी मागच्या रांगेतील जागा दिल्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाज माध्यमावरून एनडीए सरकारवर टिकेची झोड उठली असून काँग्रेसने सरकारची मानसिकता काय आहे याचा हा पुरावा असल्याचे म्हटले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, सेक्युलर सिव्हील कोड, मोदींनी हिंदूत्व सोडलं का? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करा माझा पाठिंबा
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव जाहिर करा. त्यासाठी माझा पाठिंबा असेल अशी घोषणा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना करत यावेळी पक्षाचे नेते आहेत त्यामुळेच तर जागा निवडून येतात. त्याकरीता महाविकास आघाडीने चेहरा जाहिर करावा. मी पाठिंबा देतो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यांनी …
Read More »नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहसाठी महाराष्ट्र म्हणजे एटीएम महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न
भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करून मोदी-शाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा …
Read More »
Marathi e-Batmya