राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन …
Read More »नाना पटोले यांचा आरोप,…शेतकऱ्यांच्या नावानेही पैसा खाल्ला न्यायालयाने वेळेत निकाल दिला असता तर राज्य सरकारचा निकाल लागला असता: बाळासाहेब थोरात
राहुल गांधी यांच्या भारत जोडो व भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. पण विधानसभेची लढाई सोपी नाही. केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता आहे. धनशक्ती व सत्तेचा गैरवापर करण्यात महायुती कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गाफील राहू नका. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही …
Read More »महेश तपासे यांची मागणी, सुप्रिया सुळे फोन हॅकप्रकरणी गृहविभागाने खुलासा द्यावा गृहविभागानेच पाळत ठेवल्याचा आरोप
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल व व्हाट्सअप अकाउंट हॅक केल्यावरून चर्चांना उधाण आले, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर यंत्रणेच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप आरोप भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकारवर केला. तसेच या पाळत प्रकरणी राज्याच्या गृहविभागाने खुलासा द्यावा अशी मागणी केली. …
Read More »नाना पटोले यांची टीका, भ्रष्ट युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव काढला विधानसभा निवडणूकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यदिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम राबवणार जनसन्मान यात्रेला पाच दिवसात अभूतपूर्व प्रतिसाद ;महिलांची उपस्थिती लक्षणीय...
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात व प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता. देशाचे संविधान हा …
Read More »मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहिण योजनेवरून आमदारांच्या वक्तव्यांचे पडसाद भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या वक्तव्यावरून दिली समज
साधारणतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला दोन वर्षे दोन महिने पूर्ण झाले. या दोन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टींबाबत निर्णय घेतला. मात्र केंद्रातील सरकारच्या धर्तीवर आश्वासक अनेक गोष्टींच्या घोषणा करायच्या परंतु निर्णय एकही घ्यायचा नाही …
Read More »अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,… सरकारवर बोलल्यावर माझ्या नव-याला ईडीची नोटीस येते
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत घरच्याच मैदानावर अर्थात बारामतीत नणंद विरूध्द भावजय अर्थात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली. त्याबाबत एका वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी मुलाखत देताना ती मोठी चूक होती अशी कबुली दिली. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, कर्ज घेऊन टेंडर काढले व ३० टक्के कमीशन खाल्ले महायुती सरकारला बहीण नाही तर सत्ता लाडकी- बाळासाहेब थोरात
देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत पण महाभ्रष्ट महायुती सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, शेतमालाला एमएसपी नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. महागाई व बेरोजगारी नियंत्रणाचा कार्यक्रम या सरकारकडे नाही. …
Read More »मानखुर्द येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिले अहिल्याभवन उभारणार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्याभवन’ मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा आज केली. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवनासाठी ४७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले …
Read More »नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कधी ?
राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येतील. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. …
Read More »
Marathi e-Batmya