राजकारण

उद्धव ठाकरे यांची टीका, न्यायालयाच्या आदेशानुसार लवाद नव्हे तर लबाडाने…

मागील दिड वर्षापासून आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शिवसेना कोणाची आणि कोणी शिवसेना खरी याविषयीचा निर्णय देण्याचे अधिकार न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला. त्यावरून सर्वचस्तरातून टीकेला सुरुवात झाली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कायद्याच्या कसोटी बाहेरचा असल्याचा आरोप करत शिवसेना …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, केंद्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला…

प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजना, यंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण, अनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करावी. या माध्यमातून केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

शरद पवार यांचा मोदींवर हल्लाबोल, गरज शेतकऱ्यांची… कर्जमाफी मात्र उद्योजकांची

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठी भलत्याच प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत देशातील शेतकरी आजही कर्जबाजारी आहे. शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्याची गरज आहे. या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीच्या घटकपक्षांची स्थिती गुलामासारखी..

महविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला अंतिम होईल, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते …

Read More »

‘निर्धार नारी शक्तीचा’: राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय ‘ निर्धार नारी शक्तीचा’ या घोषवाक्याखालील राज्यस्तरीय मेळावा शुक्रवार १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष …

Read More »

लोकसभा तयारीसाठी १८ जानेवारीपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे. नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होत असून विधिमंडळ पक्षनेते …

Read More »

दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. याकरिता महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी …

Read More »

राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे आणि शिंदे गटाची न्यायालयात धाव

राज्यातील बहुचर्चित शिवसेनेतील आणि सत्ताकारणातील महत्वाच्या घटनांचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेतील मागणीप्रमाणे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर शिवसेना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या …

Read More »

नऊ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम आढावा बैठकीत अजित पवार यांनी दिले हे निर्देश

राज्यातील प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमांची आखणी करताना २५ वर्षानंतरच्या विकसित महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम, योजना, उपक्रम प्रस्तावित करावेत. योजनांसाठी निधीची मागणी करताना कालबाह्य योजना रद्द कराव्यात. पुढील चार वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने सूचविलेल्या प्राधान्यक्रमानुसार नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या ७५ जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी?

महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीच्या दावोस शिष्टमंडळाबद्दल असं कळतंय की, घटनाबाह्य मुख्यमंत्री जवळपास ५० लोकांचा वैयक्तिक ताफा घेऊन दावोस ला जात आहेत. ह्यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि इतरही बरेच जण समाविष्ट आहेत. पती-पत्नी जास्तीत जास्त समजू शकतो, परंतु त्यांच्यापैकी काहींसाठी, त्यांच्या मुलांना देखील ही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत घेतले जात आहे. जवळजवळ ७० लोक …

Read More »