सध्या देशातील मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मतदान होत आहे. तर दुसऱ्याबाजूला वर्षाकाठी तरूणांना दोन कोटी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा २०१४ च्या लोकसभा निवडणूकी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मनरेगावर सातत्याने टीका करणाऱ्या मोदी सरकारने आणि सदरची योजना काँग्रेसचे …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथे दोन दिवसीय ‘विचार शिबीर’
‘घड्याळ तेच वेळ नवी’ ‘निर्धार नवपर्वाचा’ हे घोषवाक्य घेत महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरा सुरू केला असून त्याचपार्श्वभूमीवर दोन दिवसीय ‘विचार शिबीर’ ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर यादिवशी कर्जत (रायगड) येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा निर्धार, जीवात जीव असेपर्यंत आरक्षणासाठी लढणार
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार,असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …
Read More »दिवाळी सुट्टीचा असर मंत्र्याच्या मनावरून उतरेना, मंत्रिमंडळ बैठकीचेही भान राहिना
वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. …
Read More »छगन भुजबळ यांचा खोचक टोला, मराठा तरुणांनी या शेंदूर लावलेल्या दगडाच्या…
राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे मात्र आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा ओबीसींच्या महाएल्गार सभेतून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वयंघोषित नेत्यांवर घणाघात केला. ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी तसेच या बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज अंबड …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांसाठी घेतले हे निर्णय
कालपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात होत्या. त्या फैरी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती. या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत काय चर्चा झाली याची माहिती पुढे येऊ शकली …
Read More »राज्याच्या १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत. हे सादरीकरण मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले. राज्याच्या जीडीपी (विकास दर) १७ टक्के साध्य करणे, फॅब आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला गती …
Read More »राज्यातील या तीन शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्याची परवानगी
आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. …
Read More »छगन भुजबळ यांना पाडल्यास मराठ्यांचे १६० आमदार पाडू
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता ओबीसी नेत्यांनीही पुढाकार घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे . मराठा नेत्यांकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट करून निवडणुकीत पाडण्याचा ईशारा दिला गेल्याने आता भुजबळांच्या मदतीला ओबीसी नेतेही उतरले असून भुजबळांना पडल्यास राज्यात ६० टक्के लोकसंख्या असलेले ओबीसी, मराठ्यांचे १६० …
Read More »राज ठाकरे यांच्या शंकेवर मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिआव्हान
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरची डेड लाईन देऊन महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला प्रारंभ केलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असे सांगतानाच जरांगे यांचा बोलावता धनी कोण असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान …
Read More »
Marathi e-Batmya