राज्यातील शिवसेनेतील फुटीनंतर दाखल झालेल्या अपात्र आमदार याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दोनवेळा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारत त्यांच्या कामाच्या जबाबदारीची आठवण करून दिली. परंतु विधानसभाध्यक्ष तथा कुलाब्याचे आमदार असलेल्या राहुल नार्वेकर यांनी जनतेला अपेक्षित असलेला निर्णय देणार असल्याचे सांगत शेवटी लोकशाहीत बहुमताला महत्व असल्याचे सांगत अपात्र आमदार याचिकेप्रकरणी निकाल काय …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार, बार फुसका… मुंब्रा दौऱ्यावरून लगावला टोला
मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या इमारतीवर शिंदे गटाने बुलडोझर चालविल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्याचा दौरा केला. परंतु शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्या जागेजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी करत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना जागेची पाहणी करू दिली. तसेच तणावही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला होता. त्यानंतर झालेल्या छोटेखानी जाहिर सभेत …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, SC मध्ये मादिगा समाजाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार
सध्या पाच राज्यांपैकी एक राज्याच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दुसऱ्याबाजूला चार राज्यांमधील निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या चार पैकी तेलगंणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारासाठी भाजपाच्या विश्वरूप महासभेला संबोधित करताना राज्यघटनेच्या समितीत दलित अर्थात अनुसूचित जाती (SC) च्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येणार …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, खोकं रिकामं झालं असेल म्हणून डबड आणून ठेवलं
ठाणे शहरालगत असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेची इमारत शिंदे गटाने पाडल्यानंतर त्या जागेवर शिंदे गटाने त्या जागेवर दावा करत तेथे कंटेनर ठेवत शिंदे गटाची शाखा सुरु केली. मुंब्र्यातील जागा परत मिळविण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. मात्र निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे यांनी …
Read More »एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार एअर अॅब्युलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले
एकेकाळचे राज्याचे भाजपाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी छातीत त्रास सुरु झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे नेमक्या त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यासाठी एअर अॅब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे शुभेच्छा देताना म्हणाले, सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया
आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, विरोधी गटाकडून चुकीचे एफिडेव्हीट…
काल निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सुनावणी आपली प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमचे सर्व मुद्दे कागदावर आहेत. विरोधी गटाने १० वर्षांच्या मुलांचे, झोमॅटो डिलिव्हरी …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा टोला, हिरो झाले अन्… मनोज जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर
राज्यातील मराठा समाजाला कुणबी असल्याचे सरसकट जातीचे दाखले द्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकारच्या संदिग्ध भूमिकेवरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, मराठा आंदोलकांवर गोळीबार झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे हिरो झाले. आणि ते आता सरकारलाच मराठा …
Read More »अशोक चव्हाण यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा
बिहार राज्याने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के केली आहे, बिहार भाजपानेही याला पाठिंबा दिला असून आता महाराष्ट्रात देखील बिहारप्रमाणे आरक्षण मर्यादा वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण म्हणाले, बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक कालच मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील ही मागणी होवू लागली …
Read More »अखेर काँग्रेसच्या मागणीनंतर ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर
राज्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस न पडल्याने मराठवाडा, विदर्भातील काही अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहिर करावी अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र ही दुष्काळी परिस्थिती फक्त सत्ताधारी आमदारांच्याच तालुक्यात करण्याचा मुद्दा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून ९५९ तालुक्यात दुष्काळी …
Read More »
Marathi e-Batmya