सचिन सावंत यांचा आरोप, नीट (NEET) घोटाळ्याप्रमाणे MH–CET मध्येही मोठा घोटाळा दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स असलेल्यांना CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स कसे?

देशभरात नीट (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. नीट NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा चौकशातून पुढे काहीही निष्पन्न होत नाही. नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना MH – CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींनी कठोर शिक्षा करा, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी केली.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी  MH – CET परिक्षेतील घोटाळ्यावर बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, या परिक्षेचा अभ्यासक्रम हा ११-१२ वीचा असतो, १० वी १२ परिक्षेत जेमतेम मार्क्स मिळवलेल्या २२ विद्यार्थ्यांना एमएच सीईटीमध्ये मात्र १०० पर्सेंटाईल मिळालेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला १० व्या परिक्षेत ३७ टक्के मार्क्स मिळाले त्याला एमएच सीईट मध्ये ९९.९७१ टक्के पर्सेंटाईल मिळाले आहेत. बारावीत ज्यांना ५१ टक्के मार्क्स मिळाले अशा दोन विद्यार्थ्यंना एमएच सीईटमध्ये १०० पर्सेंटाईल, ४५ टक्के मार्क्स पडलेल्याला १०० पर्सेंटाईल व ३९ टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाईल पडलेले आहेत. बारावीला ज्या विद्यार्थ्याला ३५ मार्क्स पडले त्यालाही १०० पर्सेंटाईल पडले आहेत. MHT-CET गणितात १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या रँक १,२,३, ४,५,६,१५,१६,१७, आणि १८ या सर्व विद्यार्थ्यांचे एचएससी HSC गणितातील सरासरी गुण फक्त ६४.३% होते. या राज्यातील दहा अव्वल विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचे गुण या सरासरीपेक्षाही कमी होते — त्यांचे एचएससी HSC गणितातील गुण अनुक्रमे ६०,५४,५३,५३, ४० आणि ३५ होते. सीईटी CET मधील टॉप २० रँकर्सपैकी ६ विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत ६० % पेक्षाही कमी गुण मिळाले. रँक १,२,५,१२,१५ आणि १८  — ज्यांचे सीईटी CET पर्सेंटाइल ९९.९९ किंवा त्यापेक्षा जास्त आहे — यांना एचएससी HSC पीसीएम PCM मध्ये ६०% पेक्षा कमी गुण मिळाले.  एका टॉपर ला सीईटी CET गणितात १०० पर्सेंटाइल मिळाले, पण बोर्डातील एकूण पीसीएम PCM गुण फक्त ३९% होते. टॉप २० मधील १० विद्यार्थ्यांना सीएसटी CET गणितात परफेक्ट १०० पर्सेंटाइल मिळाले. मात्र त्यांच्या एचएससी HSC गणितातील गुण ३५ ते ९७ या दरम्यान आहेत — म्हणजे तब्बल ६२ गुणांचे अंतर. एका ला सीईटी CET गणितात १०० पर्सेंटाइल, पण एचएससी HSC गणितात फक्त ३५% गुण — म्हणजे ६५ गुणांचे अंतर. एचएससी HSC, जीसीएम PCM मध्ये फक्त ३९% गुण असूनही राज्यातील टॉप २० मध्ये स्थान मिळाले आहे. रँक ६६ चा डेटा देखील गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. या विद्यार्थ्याला १० वीला गणितात २२ मार्क्स मिळाले होते, तर १२ वी ३३ मार्क्स मिळाले म्हणजे तो गणितात सपशेल नापास आहे, पीसीएम मध्ये ४७.६७ टक्के मार्क्स आहेत त्याला सीईटी मध्ये मात्र ९९.९७१ पर्सेंटाईल मिळाले आहेत. सीईटी CET मध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळवूनही बोर्ड परीक्षेतील कामगिरी त्याच प्रमाणात दिसत नाही. अशा उदाहरणांमुळे सीईटी CET आणि एसएससी HSC या दोन्ही मूल्यमापन पद्धतींमध्ये मोठी विसंगती असल्याचे अधिक स्पष्ट होते. हा चमत्कार कसा झाला, याचे उत्तर उच्च व तंज्ञ शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावे. तसेच या परिक्षा कोण नियंत्रित करतो, या परिक्षांवर जोशी नामक व्यक्तीचा काय संबंध आहे, याचाही खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी परिक्षा पे चर्चा वर दरवर्षी मोठे प्रवचन देत असतात पण त्यांच्याच कार्यकाळात व्यापम सारखे परिक्षा घोटाळे फोफावत आहेत ही चिंतेची बाब आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या राज्यातच परिक्षेत गडबड घोटाळे वाढले आहेत व त्या घोटाळ्यातील लोकांचे संबध भाजपा नेत्यांशी असल्याचे उघड झाले आहेत. एमएच सीईटीच्या परिक्षेतील घोटाळ्यावर मी एक्स या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली होती, त्यावर या परिक्षा घेणाऱ्या सेलकडून यादी अस्पष्ट आहे असा खुलासा करण्यात आला आहे. या यादीतीला विद्यार्थ्यांची नावे सार्वजनिक होऊ नयेत म्हणून ती झाकण्यात आली होती. आता मी पुन्हा एमएच सीईटी कमिशनला एक यादी व पत्र देणार आहे, त्यावर त्यांनी खुलासा करावा. एमएचसीईट परिक्षा सेलमध्ये मागील ८-१० वर्षे तेच अधिकारी काम करत असून त्यांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. नीट, एमएच-सीईट सारख्या परिक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्य ठरवणाऱ्या असतात त्यात अशा प्रकारे घोटाळे करून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करा महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *