राज्यातील शिवसेनेतील फुटीमुळे खरी शिवसेना कोणाची यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा की नाही यासह सर्व याचिकांवरील निर्णय येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सांगत सुनावणी तहकूब केली. निवडणूक चिन्हासंदर्भात …
Read More »अखेर सरकारला फटकारत तीस्ता सेटलवाड यांना न्यायालयाकडून जामीन मग काय तुरुंगात ठेवावे का असा सर्वोच्च न्यायालयचा सवाल
गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यायालयाकडून क्लिन चीट मिळाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दंगलप्रकरणी काँग्रेसचे स्वर्गिय नेते अहमद पटेल यांच्याकडून पैसे घेवून तीस्ता सेटलवाड यांनी सरकार विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप केला. त्यानंतर गुजरात एटीएसने तातडीने तीस्ता सेटलवाड यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत मुंबईतून अटक केली. …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा निर्णयः गुजरात दंगलीचे १० खटले बंद नवे सरन्यायाधीश यु.यु.लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीशी संबधित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दाखल केलेल्या याचिकेसह सर्व याचिकांवरील सुनावणी बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज दिला. गुजरात दंगलीप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह जवळपास दहा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी आता सुनावणी घेणे निष्फळ अयोध्या जमिन वाटप खटल्याचा संदर्भ देत खटले बंद कऱण्याचा निर्णय
१९९२ साली बाबरी मस्जिदीचे संरक्षण कऱण्याची हमी देऊनही मस्जिदीचे संरक्षण केले नसल्याने न्यायालयाचा अवमान केल्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. या याचिकेवरील सुनावणी घेणे निष्फळ असल्याचे सांगत हा खटला आता बंद करण्यात येत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या संजय किशन कौल आणि अभय एस ओक यांच्या दोन …
Read More »भरत गोगावले यांचे मोठे विधान, …न्यायालयाचा निकाल येणार नाही सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांबाबत केले मोठे वक्तव्य
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल अद्यापही न आल्याने राजकीय पेच कायम आहे. सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुनावणीबाबतची अनिश्चितता कायम असल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया …
Read More »९ वर्षाच्या लढ्यानंतरही वाचविता आले नाही ट्विन टॉवरला, अखेर जमिनदोस्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्फोटकांनी उडवून दिली इमारत
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या धर्तीवर नोएडा येथे सुपरटेक कंपनीने १०० मीटर उंच आणि २९ मजल्याच्या ट्विन टॉवरची उभारणी केली. मात्र हे टॉवर अनधिकृतपणे उभारण्यात आल्याने ९ वर्षे न्यायालयीन लढा आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही दिलासा न मिळाल्याने अखेर या टॉवरला स्फोटके लावत जमिनदोस्त करण्यात आले. दुपारी अडीच वाजता या इमारतीत …
Read More »सोलापूरचे सुपुत्र न्यायमुर्ती उदय लळीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि …
Read More »बिल्कीस बानो प्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश
देशभरात गाजलेल्या बिल्कीस बानो प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या ११ आरोपींवर दया दाखवित त्यांची मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका गुजरात सरकारने केली. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनाही गुजरात सरकारने पायदळी तुडवित या आरोपींना दया दाखवित शिक्षा माफ करून तुरुंगातून मुक्तता केली. यावरून देशभरात एकच खळबळ माजली. या निर्णयाच्या विरोधात …
Read More »उध्दव ठाकरे – एकनाथ शिंदे वाद आता पाच सदस्यीय घटनापीठासमोर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
अखेर पाचवेळा तारखा पुढे ढकलल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे प्रकरणाची याचिका पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेत परवा यावर घटनापीठासमोर सुनावणी घेण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन.व्ही.रमणा यांनी देत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत पुढील सुनावणी घेवू नये असे आदेशही त्यांनी निवडणूक आयोगाला …
Read More »न्यायालयाची सुनावणी पुढे ढकल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आपण संघर्ष करू त्यांनी लाज लज्जा सोडली
शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाची एकनाथ शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना …
Read More »
Marathi e-Batmya