शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी ‘अजित पवारांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो,’ असं विधान केलं आहे. यावर अजित पवार यांनी मिश्कील …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,… उद्धव ठाकरेंशी आम्ही चर्चा करणारच नाही
भाजपा आणि शिंदे गटात जाहिरातीवरून तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात असतानाच भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्याने शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मोदी@ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी मौर्य यांनी उद्धव ठाकरे …
Read More »सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय …
Read More »जाहिरात वादावर शरद पवार यांची खोचक प्रतिक्रिया, आमच्या ज्ञानात भर पडली…
शिंदे गटाकडून ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजपा-शिंदे गटाच्या कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आता या जाहिरात वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी १६ जून रोजी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, …
Read More »सुधारीत जाहिरात प्रश्नी मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, अतिउस्ताही कार्यकर्त्या…
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटात तणाव असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघावरून दोन्ही पक्षांमधील नेते भिडले. त्यापाठोपाठ राज्यातल्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. तसेच या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …
Read More »सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार
केंद्र व राज्य सरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान मरीन ड्राईव्ह …
Read More »लोकसभा अध्यक्ष, विधानसभाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय विधायक संमेलनाचे उद्धघाटन
जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी’च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३ चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानपरिषद …
Read More »भाजपाचा सवाल, कर्नाटक सरकारची हिंदुत्वविरोधी भूमिका उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?
कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या शालेय पाठ्यपुस्तकांमधून रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि स्वा. सावरकर यांच्यावरील धडे वगळणे, धर्मांतर विरोधी कायदा रद्द करणे या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे व संजय राऊत काही बोलणार आहेत का असा परखड सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »सुप्रिया सुळे यांचे कौतुगोद्गार की…अजित दादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नवी दिल्लीतील या कार्यक्रमासाठी राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही पक्ष संघटनेत जबाबदारी सोपविण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर …
Read More »अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न
गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका …
Read More »
Marathi e-Batmya