Editor

महिलांप्रश्नी आता भाजपाच्या महिला आमदारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकता येणार नसल्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच प्रश्नी दिल्लीसह भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह …

Read More »

पीएमसीसह या २१ बँकांच्या खातेदारांना मिळणार ५ लाख रुपये २९ नोव्हेंबर पर्यंत मिळणार पैसे

मुंबई : प्रतिनिधी २१ बुडीत बँकांच्या ग्राहकांना या वर्षी डिसेंबरपर्यंत पैसे मिळू शकतील. ठेवींवर सरकारच्या असलेल्या हमीखाली हे पैसे खातेदारांना मिळतील. या अंतर्गत खातेधारकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. गेल्या महिन्यात संसदेने ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२१ मंजूर केले. यानुसार, आरबीआयने बँकांवर स्थगिती लागू केल्याच्या ९० दिवसांच्या आत खातेधारकांना ५ लाख रुपये मिळणार आहेत. बँकांमध्ये ज्या काही ठेवी ठेवल्या जातात, त्या विम्याच्या कक्षेत येतात. याचा अर्थ असा की जर बँक बुडली किंवा दिवाळखोर झाली तर खातेदाराला जास्तीत जास्त ५ लाख रुपये    मिळतील. अलीकडच्या काळात, पीएमसीसह एकूण २१ सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या. यामुळे या बँकांच्या सर्व खातेधारकांना या विम्याअंतर्गत पैसे मिळण्याचा हक्क राहणार आहे. बँकांमधील ठेवींचा विमा डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केला जातो. डीआयसीजीसीने म्हटले आहे की, बँकेच्या विमा उतरवलेल्या ठेवींच्या ठेवीदारांना पैसे देण्याची योजना आहे. हे पैसे डिसेंबरपर्यंत मिळू शकतात. डीआयसीजीसीने म्हटले आहे की एकूण २१ बँका त्याच्या कक्षेत आहेत. पीएमसी ही सर्वात मोठी बँक आहे. काही आवश्यक सूचना त्या बँकांना दिल्या आहेत. बँकांना ४५ दिवसांच्या आत आपले दावे सादर करावे लागतील. त्यानंतर या दाव्यांची छाननी केली जाईल. पडताळणी केल्यानंतर पुढील ४५ दिवसात बँकेला पैसे दिले जातील आणि ते पैसे खातेदारांना दिले जातील. याचा अर्थ २९ नोव्हेंबरपर्यंत बँकेच्या दाव्यांची छाननी केली जाईल. DICGC सुधारणा विधेयक ऑगस्ट २०२१ मध्ये संसदेत मंजूर झाले. यामध्ये बँक ठेवींवरील विमाधारक हमी ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे पैसे रिझर्व्ह बँकेच्या स्थगिती कालावधीनंतर ९० दिवसांच्या आत दिले गेले पाहिजेत. पूर्वी विम्याची रक्कम एक लाख रुपये असायची. या २१ बँकाच्या ठेवीदारांना मिळेल भरपाई १) अदूर को ऑप. अर्बन बँक, केरळ २) बिदर महिला अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र …

Read More »

महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्येच आघाडीवर फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित झालेल्या NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर मविआ सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला तेथील महिलांचीही …

Read More »

सावधान ! तुमचा फोन खूप लवकर डिस्चार्ज होतोय का? असू शकतो व्हायरस हँकिंग टाळण्यासाठी हे काम त्वरित करा

मुंबई: प्रतिनिधी आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन (internet connection) आहे आणि सोशल मीडिया (social media) वर अकाऊंट देखील आहेत. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतात आणि आपली माहिती हॅकर्सला देतात. विशेष …

Read More »

एचडीएफसीची गृहकर्ज व्याजदरात कपात, ‘हा’ आहे नवा दर नव्या गृह कर्जदारांनाही मिळणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी एचडीएफसी लिमिटेडने सणासुदीच्या काळात ग्राहकांना गृहकर्जावर मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या सर्व स्लॅबवर ६.७० टक्के व्याज आकारले जाईल. एचडीएफसीची ही ऑफर सर्व नवीन गृहकर्जावर २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. हा विशेष दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेला आहे. कर्जदारांना या योजनेचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार …

Read More »

“सिर्फ एक” चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात संपन्न प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात

पुणे: प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर किती प्रभाव झाला आहे आणि त्याच्या फायद्या सोबत तोट्यांवर प्रकाश टाकत गुन्हेगारीकडे पौगंडावस्थेतील मुलांचा वाढता कल आदी पैलू उलगडणारा सिर्फ एक हा एक क्राइम जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आज पुण्यात संपन्न झाला असून प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात करण्यात …

Read More »

निफ्टीची १० हजाराने वाढ: रिलायन्सचा सर्वाधिक वाटा, सरकारी कंपन्या पिछाडीवर निफ्टीचा ७५११ ते १७५१९ पर्यंतचा प्रवास

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून १० हजारांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक योगदान दिले आहे. निफ्टीच्या या वाढीत रिलायन्सने तब्बल एक हजार अंकांचे योगदान दिले. तर सरकारी मालकीच्या कंपन्यांचे या वाढीसाठी फार कमी योगदान राहिले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निफ्टी ७५११ अंकांवर …

Read More »

….मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं ? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असं राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी …

Read More »

पॅन आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ‘ही’ आहे नवीन तारीख मात्र या गोष्टींची घ्या काळजी

मुंबई : प्रतिनिधी पॅन कार्डशी आधार कार्ड जोडण्याची मुदत आता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. आयकर विभागाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी पॅन आधारशी जोडण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख दिली होती. मात्र, …

Read More »

WhatsApp वर ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत आहे हे नवे फिचर व्हाईस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट मध्ये उपलब्ध

मुंबई: प्रतिनिधी ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन फिचर्समुळे ग्रुप कॉल करणं सोपं होणार आहे. व्हॉट्सअॅपने अलीकडेच 2.21.19.15 बीटा अपडेट जारी केले आहे. WABetaInfo च्या एका अहवालातून समोर आलं आहे की, या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना ग्रुप कार्डद्वारे ग्रुप कॉल करणं खूप सोपं होईल. या नवीन अपडेटमध्ये व्हॉइस …

Read More »