मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली …
Read More »मेडिकलची अंतिम वर्षाची परीक्षा नाही तर इंटर्नशिप नाही: केंद्रीय परिषदेची भूमिका येत्या ३१ जुलैला न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडू- अमित देशमुख
मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र यास केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार …
Read More »केंद्राचे शिक्षण धोरण म्हणजे देशाचा उलटा रोडमॅप शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी देशातील नवी पिढी घडविण्यासाठी तब्बल ३० वर्षानंतर केंद्र सरकारने नवे शिक्षण धोरण तयार करत आज त्यास मान्यता देण्यात आली. मात्र या धोरणामुळे देशाला मागे घेवून जाणारा उलटा रोडमॅप असल्याची टीका शिक्षक भारती प्रमुख तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. 1) गरीब आणि बहुजनांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित ठेवणारं. 2) …
Read More »कोरोना: राज्यात २० लाख १६ हजार चाचण्यानंतर रूग्णसंख्या पोहोचली ४ लाखावर ९२११ नवे बाधित रूग्ण, २९८ जणांचा मृत्यू तर ७४७८ जण झाले बरे
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यत २० लाख १६ हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आज राज्यात ९२११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ इतक्यावर पोहोचली आहे. तर आज ७४७८ जण बरे होवून …
Read More »अखेर राज्य सरकारला झाली एसटी कर्मचाऱ्यांची आठवण एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच बैठक घेणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी मागील तीन ते चार महिन्यापासून कोरोनाकाळातही आपली सेवा बजाविणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना अद्याप पगार मिळालेला नाही. तरीही हे कर्मचारी सतत काम करत आहेत. त्यामुळे अनेक एस.टी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत ओढावत आहे. यापार्श्वभूमीवर अखेर अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षखाली लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब …
Read More »या विभागातील पदोन्नतीची साखळी सुधारणार अधिनियम दुरूस्तीचे विधेयक सादर करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम ५ पोट – कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिनियमातील दुरुस्तीबाबतचे विधेयक विधानमंडळास सादर करण्यात येईल. यापूर्वी सेवा प्रवेश नियम करत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या …
Read More »शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांना वाढीव खर्चासह ६ महिन्याची मुदतवाढ ५० टक्के सुरक्षा रक्कम परत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोव्हिडची महामारी ही नैसर्गिक आपत्ती गृहीत धरून शासकीय कंत्राटदारांच्या अडचणींवर उपाय करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या उपाययोजनांमुळे कंत्राटदारांकडे रोकड सुलभता येवून विकास कामांची गती मंदावणार नाही. केंद्र शासनाच्या गृह विभागाने तसेच राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करुन लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांची गती …
Read More »१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेसकडून अभिनंदन! कोरोना रूग्णसंख्येत जगात तिसरा क्रमांक पटकावून मोदीनी भारताची किर्ती वाढविल्याची प्रवक्ते सावंत यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी सहा वर्षापूर्वी सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. परंतु त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून १५ लाख देऊ हे आश्वासन मात्र आता पूर्ण केले. केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला कोरोनाचे १५ लाख रूग्ण दिले …
Read More »ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका अर्थसंकल्पातील घोषणेची पूर्तता- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. मार्च मध्ये झालेल्या …
Read More »राज्याचा निकाल ९५.३० टक्के तर मुलींच्या निकालात ३ टक्क्यांनी वाढ कोकणाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी
मुंबई: प्रतिनिझी यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली, म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »
Marathi e-Batmya