Editor

पत्रकारतेतील दिनू रणदिवे नामक धडाडीचा आवाज बंद झाला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील नामवंत आणि आदराने नाव घेणाऱ्यांच्या पत्रकारांच्या यादीतील ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. पत्रकारातेतील निवृत्तीनंतरही अनेक अन्यायकारक घटनांना आपल्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारी वृत्तीने आवाज फोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी नेहमीच दलित, वंचित, उपेक्षितांच्या आवाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

कोरोना: आतापर्यतची सर्वाधिक मृतकांच्या संख्येची नोंद २ हजार ७८६ नव्या रूग्णांची नोंद तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या बरे होवून गेलेल्या रूग्ण संख्येपेक्षा जास्त असायची. मात्र आज विक्रमी ५ हजार रूग्णांना घरी पाठविण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५६ हजारावर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर आली आहे. मात्र आज पर्यंतच्या सर्वाधिक संख्यांना मागे टाकत मृतकांची तब्बल १७८ वर …

Read More »

चीनसह १२ देशांची राज्यात १६ हजार कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री देसाईंच्या उपस्थिती करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई: प्रतिनिधी एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करुत. हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र …

Read More »

राज्यपाल कोश्यारींनी मिळविला प्रथम क्रमांक आणि २५ हजाराचे बक्षिस डाक विभागाच्यावतीने राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा गांधीवरील पत्रलेखन स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक पी सी जगताप व सहाय्यक अधिक्षक एस डी खरात …

Read More »

भाजपा देणार कोकणवासियांना पत्रे, सौर कंदिलासह या गोष्टी प्रदेशाध्यक्षांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील बांधवांना थेट मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने निर्धार केला असून या कामात नागरिकांनी पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांना पाठविलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपाने तातडीची मदत म्हणून कोकणवासियांसाठी काही गाड्या भरून साहित्य मुंबईतून …

Read More »

खुशखबर : दुसऱ्यांदा एकाच दिवसात विक्रमी कोरोनाग्रस्त बरे होवून घरी गेले एकाच दिवशी ५ हजार ७१ रुग्णांना घरी सोडल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधीक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी …

Read More »

‘बायजुस – द लर्निंग अॅप’ ची महाराष्ट्र पोलिसांना अशीही मदत शालेय विद्यार्थ्यांना मोफत अॅप उपलब्ध करून देणार

मुंबई: प्रतिनिधी कोविड विरोधी लढ्यात सर्वात पुढे असलेल्या राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी बायजुस अॅपने पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या पाल्यांना अर्थात शालेय मुलांना विनाशुल्क बायजुस-द लर्निग अॅप कंपनीने ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचे अॅप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत पोलिसांना एक आगळी वेगळी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली असली …

Read More »

अत्यावश्यक सेवेतील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अशी आहे नियमावली अधिकृत क्यु आर कोडचे तिकिट असेल तरच रेल्वे स्थानकात प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने मोठ्या प्रयत्नाने रेल्वे सेवा सुरु केली. मात्र या रेल्वे प्रवासासाठी सर्वाधिक अधिक सदर कर्मचारी अधिकाऱ्याकडे त्याचे महापालिका, मंत्रालय, खाजगी-शासकिय रूग्णालयात काम करत असलेच्या प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर व्यक्तीकडे क्यु आर कोड असलेले रेल्वेचे …

Read More »

अखेर या पध्दतीने राज्यात शाळा सुरु : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षास सुरुवात १ ली-२ रीचे वर्ग वगळता कोरोनाग्रस्त भागात ऑनलाईन तर ग्रीनमध्ये प्रत्यक्ष शाळा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु …

Read More »

राज्यातली जमिन तेलंगणाच्या नावावर करण्याचा भाजपा सरकारचा पराक्रम महाविकास आघाडी सरकारकडून चौकशी समिती जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी विदर्भाला लागून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील मेडीगड्डा बॅरेज कामासाठी राज्यातील जमिन तेलंगणा राज्याला अधिगृहीत करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच अधिग्रहण केल्यानंतर सदरची जमिन त्यांच्या नावावर करण्याचा प्रकार फडणवीस सरकारच्या काळात घडल्याचे उघडकीस आल्याने या सर्व प्रक्रियेचीच चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून यासंदर्भात जलसंपदा विभागाने …

Read More »