Editor

कोरोना दिलासा : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱे जास्त नवे बाधित रूग्ण ७९२४, बरे झालेले ८७०६ तर मृतकांची संख्या २२७

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच कोरोबाधित रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त ठरली आहे. मागील २४ तासात ७९२४ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ८७०६ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या २ लाख २१ हजार ९४४ वर पोहोचली आहे. …

Read More »

भाजपाच्या ‘रक्षक बंधन’ उपक्रमाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ 'एक घर दोन राख्या' चे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष मुंबई आयोजित “रक्षक बंधन” या उपक्रमाचा आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना हेदेखील उपस्थित होते. “रक्षक बंधन” कार्यक्रमांतर्गत कोविड योद्धे डॉक्टर्स, वैद्यकीय …

Read More »

तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्हयातील ‘कोरोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, …

Read More »

मराठा आरक्षणाची सुनावणी आता ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष होण्याची शक्यता आजची सुनावणी समाधानकारक पण पुढील सुनावणी २५ ऑगस्टला : अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या ऑनलाईन सुनावणीवेळी पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सुनावणी ऑनलाईन घेण्याऐवजी ती प्रत्यक्षात घ्यावी, हे प्रकरण सैविधानिक खंडपीठाकडे पाठविण्याची मागणी राज्य सरकारने सर्वेाच्च न्यायालयाकडे केली. यावर आता ऑनलाईन पध्दतीऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाने विचार करणार असल्याचे स्पष्ट करत पुढील …

Read More »

कोरोना: मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा वेग ६७ दिवसावर ९४३१ नवे रूग्ण, ६०४४ बरे, २६७ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्येच्याबाधीत सर्वात अधिक असलेल्या मुंबई शहरातील कोरोना रूग्णवाढीचा दर आता १ टक्क्यावर आला आहे. तर रूग्ण दुपटीचा वेग ६७ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामु‌ळे शहरात कोरोना विषाणूवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाल्याचे दिसून येत असून मागील २४ तासात १११५ रूग्ण आढळून आले आहेत. तर ५७ …

Read More »

महास्वयंम आणि ऑनलाईन मेळाव्यातून १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार १ लाख ७२ हजार बेरोजगारांची नोंदणी : कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी …

Read More »

उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

पुणे: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली असून ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने …

Read More »

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीतर्फे १ ऑगस्टला आंदोलन भाजपाचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजपा, रयत क्रांती,  रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महायुतीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्ष …

Read More »

फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांना, आर्थिक संकटातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचार्‍यांची सध्या परवड सुरू आहे. हे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचे २५ टक्के वेतन अजून मिळालेले नाही, मे महिन्याचे ५० टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे १०० टक्के वेतन अजून मिळालेले …

Read More »

कोरोना: ७२२७ सह राज्यात २ लाखाहून अधिकजण घरी : मुंबईत ६ हजारावर मृत्यू ९२९१ नवे बाधित रूग्णांचे निदान तर २५८ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज ७२२७ जण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ७ हजार ११९ वप पोहोचली आहे. ९२९१ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ४८१ वर पोहोचली असून …

Read More »