मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कायम विना अनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याचा निर्णय २०१६ साली घेण्यात आला. मात्र अनुदान देताना या शाळांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे यां शाळांची शालेय शिक्षण विभागाबरोबरच वित्त विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. …
Read More »मंत्री आणि विरोधी पक्षनेते तुम्ही दुसरा अध्यक्ष नेमलाय का? विधासभा अध्यक्ष नाना पटोलेंची भर सभागृहातच विचारणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रश्नोत्तरे सुरु झाली. त्यामुळे अखेर सभागृहात अध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांन तुम्ही दोघांनीच दुसरा अध्यक्ष नेमलाय का? अशी मिश्किल विचारणा करत …
Read More »आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे नाही, मग मुख्य सचिवांना माफीची शिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर एकवेळ संधी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे कायदेमंडळ असलेल्या विधानसभा सदस्यांकडून मतदारसंघातील अनेक प्रश्न औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करण्यात येतात. मात्र संबधित विभागाकडून महिना उलटून गेला तरी त्यावर उत्तर दिले जात नसल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी विधानसभेच्या दरवाज्यात उभे राहून सभागृहाची माफी मागावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …
Read More »फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींच्या जात प्रवर्गाचा उल्लेख ओबीसीच्या स्वतंत्र जणगणनेच्या चर्चेवेळी विधानसभेत आणले उघडकीस
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात अथवा देशाच्या घटनात्मक पदावर काम करणारे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या जातीचा उल्लेख न करण्याची परंपरा आहे. तसेच संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळातही महत्वाच्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या जातीचा उल्लेख न करण्याचे नियम आहेत. मात्र भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार २० लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्च मिळणार चार मोठ्या आजारांच्या समावेशाची आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नविन आजारांचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यामध्ये हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यांचा समावेश करण्यात आला आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार …
Read More »गेल्या वर्षभरात मुंबईतील १४०२ बालकांनी गमावला प्राण तर राज्यात १३ हजार ७० बालकांचा मृत्यू
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील नवजात बालमृत्यूच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी सरकार आणि विविध सामाजिक संघटनाकडून प्रयत्न करण्यात येतात. तरीही बालमृत्यूच्या संख्येत वाढच होत असून गेल्यावर्षी तब्बल १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला तर मुंबईत १ हजार ४०२ बालमृत्यू झाल्याचे एच.एम.आय.एस. च्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत उघडकीस आली. …
Read More »मुस्लिम आरक्षणामुळे मराठा, ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुस्लिम समुदायाला पुन्हा आरक्षण देण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करताच भाजपा नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल असा इशारा दिला. विधान परिषदेत मलिक यांनी घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. …
Read More »फडणवीसांनी रद्द केलेले मुस्लिम आरक्षण महाविकास आघाडी देणार विधान परिषदेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने रद्दबातल ठरविलेले मुस्लिम समाजाचे आरक्षण विद्यमान महाविकास आघाडी पुन्हा बहाल करणार आहे. पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला सच्चर समितीच्या शिफारसीनुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र त्यास भाजपा सरकारने ब्रेक लावला. परंतु विद्यमान महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाला …
Read More »ओबीसी स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी सर्वपक्षिय शिष्टमंडळ दिल्लीला विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपाची संयुक्त मागणी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील ओबीसी समाजाची लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नसल्याने त्यांना आरक्षणाचा, आर्थिक सवलतीचे फायदे देता येत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची जातनिहाय स्वतंत्ररित्या जणगणना करण्यात यावी अशी मागणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने संयुक्तरित्या मागणी केली. तसेच २०२१मध्ये होणाऱ्या जणगणनेत ओबीसींची जातनिहाय संख्याही गोळा करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन २०२२ मुंबई १ मार्चपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईः प्रतिनिधी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिशन मुंबई २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या मिशनच्या निमित्ताने १ मार्च रोजी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर सोमय्या मैदान चुनाभट्टी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत …
Read More »
Marathi e-Batmya