Editor

महाविकासच्या मंत्री, आमदारांवर उपमुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष दैनदिन हजेरी, चर्चेतील सहभागावर नजर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर येवून चार महिने झाले. मात्र संख्याबळात तुकड्यांनी असल्याचा गैरफायदा भाजपाने घेवू नये यासाठी आघाडीच्या सर्व आमदार, मंत्र्यांवर विधानसभा आणि विधान परिषदेतील हजेरीवर धास्तावलेल्या उपमुख्यमंत्री कार्यालय अर्थात अजित पवार यांच्याकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री …

Read More »

आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हरच्या वेतनसाठीही विधेयक आणणार सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवर अजित पवारांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्व आमदारांच्या वाहनावर काम करणाऱ्या खाजगी ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांकडून आमदारांची काळजी घेतली जाते. मात्र या वाहन चालकांना फारच तुटपुंजी रक्कम वेतनाच्या स्वरूपात मिळते. त्यामुळे आमदारांच्या वाहनावर काम करणाऱ्या वाहन चालकांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुधीर …

Read More »

गृहनिर्माण मंत्र्यांकडून फडणवीसांचे कौतुक आणि कारभारावर टीकाही भाजपा आमदारांच्या प्रश्नांवर आव्हांडाचा टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या प्रश्नावर विधानसभेतील चर्चेदरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही मोठे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी आणि पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगत त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार आणि विकासकांशी असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. …

Read More »

मुंबई महानगरात दोन वर्षात ३० हजार घरे बांधणार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसात मुंबईत १ लाख ५६ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. ही घरे सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसल्याने विनाविक्री पडून आहेत. तसेच बाजारात मंदी आहे. मात्र आता काही नव्याने धोरण स्विकारत १ मे पूर्वी अर्थात महाराष्ट्र ६१ वर्षात पदार्पण करण्याच्या आधी मुंबईत परवडणाऱ्या दरातील ३० हजार घर …

Read More »

एमएमआरडीएचे १६ हजार कोटी मुंबई महापालिकेने थकविले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी एमएमआरडीच्या माध्यमातून मुंबईत अनेक प्रकल्प राबविले जातात. भांडवली खर्चापैकी १६ हजार ६६४ कोटी एवढी रक्कम मुंबई महानगरपालिकेकडून एमएमआरडीएला येणे अपेक्षित आहे. या रकमेतून झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत एमएमआरडीएकडून ८८.७५ कोटी रक्कम मुंबई महानगर पालिकेला येणे अपेक्षित असल्याने ही रक्कम वजा करून उर्वरित रक्कम देण्यासाठी प्राधिकरणाने विनंती केली आहे. ही थकित …

Read More »

नादीरशहानंतर अमित शाहंची नोंद होईल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी इतिहासात नादिरशहाने दिल्ली जाळल्याची नोंद आहे. त्यामुळे आता नादिरशहानंतर अमित शाह यांचे नाव दिल्ली जळीत प्रकरणामध्ये निश्चितपणे नोंदले जाईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. दिल्ली जळत असताना पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलिस ‘मूक दर्शक’ बनून राहिले. …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींची योजना आल्यावर जाहीर करू शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे अजूनही दूरच

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाविकास आघाडीकडून कर्जमाफी देणे सुरु करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याबाबत पंतप्रधान मोदींची हमीभाव योजना येणार असून त्याची वाट आम्ही बघत असल्याची खोचक टीका मोदी यांच्यावर करत ही योजना आल्यानंतर त्याचा अभ्यास करून महाविकास आघाडीची हमीभाव योजना …

Read More »

अर्थसंकल्पात पाणी पुरवठा खाजगीकरण, मोफत वीज, रेडिरेकनर दर कपातीचे संकेत ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीतील आप सरकारच्या धर्तीवर राज्यातील जनतेलाही मोफत पायाभूत सुविधा पुरविण्याचे संकेत यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर करण्यात येणार असून या अर्थसंकल्पातून राज्यातील १० महानगरपालिका आणि ग्रामीण भागातील सत्तेची केंद्रे पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका …

Read More »

शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणांची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक काढणी करण्यासाठी कंबाईंड हार्व्हेस्टींगचा वापर केला होता. यामुळे महाबिज मंडळ व शेतकरी यांना बियाणे पुरविताना अनावधानाने त्यात अगोदर शिल्लक असलेल्या दुसऱ्या सोयाबिन वाणाचे बियाणे मिसळले गेल्याने भेसळ आढळून आली. विद्यापीठांना एकत्रित कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील. याचबरोबर खासगी कंपन्या भेसळयुक्त …

Read More »

हत्तीरोगाचे २०२१ पर्यंत उच्चाटन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २ मार्च ते २० मार्च २०२० पर्यंत  नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, या ६ जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची व्यापकता लक्षात घेऊन कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या माध्यमातून अंतरविभागीय समन्वय पर्यवेक्षण व जनजागृती वर भर द्यावा. सर्व …

Read More »