Editor

महाविद्यालये व विद्यापीठामंधील १५६० शिक्षकीय पदांना मान्यता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठे यांमधील मंजूर पदांपैकी शिक्षकीय रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १५६० शिक्षकीय पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शिक्षकीय रिक्त पदे भरण्यासंदर्भातला प्रस्ताव उपसमितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. …

Read More »

अलमट्टीतून ३८००००, कोयनेतून ६९०७५ तर राधानगरीतून ७३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग पुराचा विळखा कमी होणार

मुंबई : प्रतिनिधी अलमट्टी धरणातून 3 लाख 80 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे …

Read More »

भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करत आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते सैरसफाटा मारायला आणि सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. हे भाजप सरकार असंवेदनशील …

Read More »

सांगली, कोल्हापूर मंत्र्यांसाठी जलपर्यटन क्षेत्र घोषीत करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली आणि साता-यातील जनतेचे आयुष्य भीषण पूरपरिस्थितीमुळे उद्धवस्त झाले असताना दोन दिवस पूरात बुडल्याशिवाय मदत मिळणार नाही, असा आदेश काढणा-या असंवेदनशील व बेफिकीर सरकारला जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका करत पश्चिम महाराष्ट्राला पुराने वेढले असताना जलसंपदा मंत्री महाजन हे सेल्फीचा आनंद काढत फिरत आहेत. …

Read More »

मुख्यमंत्री महोदय…महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या केवळ १० किलो धान्याचा आदेश हि पुरग्रस्तांची थट्टा असल्याचा नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

मुंबई : प्रतिनिधी माझ्या वक्तव्यांना तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तरीही त्याचे स्वागत करतो. मात्र तुमच्यापुढे सनदशीर मार्गाने मांडलेली राज्याची वास्तविक पुरपरिस्थिती तरी गांभीर्याने घ्या, ते ही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्या जिवांना तरी तुमच्या गांभीर्याने घेण्याचा निकष लागु होतो का ?ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसविले त्या …

Read More »

न बोलताही कृतीतून बोलणारे फोटो काय ते तुम्हीच ठरवा

सांगली, कोल्हापूर, कराड भाग पूरग्रस्त बनला. मात्र पुराचे गांभीर्य फारच थोड्याजणांच्या लक्षात आले. या दोन फोटोतील एकजण सत्ताधारी आहे, तर दुसरा विरोधक. तुम्हीच ठरवा काय ते….. Share on: WhatsApp

Read More »

जनता पुरात तर भाजपा -शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात दोन्ही पक्षांकडून लाजीरवाणे कृत्यः विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली आणि कराड भागातील जनता पुराने त्रस्त असताना मदत व पुनवर्सन मंत्री सुभाष देशमुख हे पुण्यात पक्षाचा मेळावा घेण्यात मग्न असचे दिसून आले असून अशा असंवेदनशील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी ताततडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसेच ज्या कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला पाच आमदार, दोन खासदार दिलेत ती शिवसेनाही पूरग्रस्तांना मदत पोहचवण्याकडे …

Read More »

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बीयाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन …

Read More »

कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने …

Read More »

१० वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेकडून २० गुण मिळणार यंदाच्या वर्षापासून गुण देण्यात येणार असल्याची शिक्षण मंत्री शेलार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांच्या प्रगती करीता पुन्हा एकदा शालेय अंतर्गत २० गुण देण्याची पध्दत पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्याच्या १०० मार्काची पध्दत बंद करून पुन्हा एकदा ८० लेखी परिक्षेला तर २० हे गृहपाठ, तोंडी परिक्षा, खेळ आदी अंतर्गत पध्दतीला करण्याचे निश्चित …

Read More »