Editor

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प तर उपाध्यक्ष म्हणून जेडी व्हान्स यांनी घेतली शपथ व्हाईट हाऊसमध्ये पार पडला शपथविधी सोहळा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेचा सुवर्णकाळ आत्तापासून सुरू होत आहे” आणि दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी २० जानेवारी रोजी एका अंतर्गत समारंभात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुनरागमन केले. रिपब्लिकन नेत्याने अलीकडील निवडणुकीत व्हाईट हाऊसमध्ये अभूतपूर्व पुनरागमन केले – महाभियोग, गुन्हेगारी आरोप आणि दोन हत्येच्या प्रयत्नांवर मात करून. “न्यायाचे प्रमाण …

Read More »

अदार पूनावाला दावोसमध्ये, चपलीच्या किंमतीपेक्षा लसीची किंमत स्वस्त… दावोसमध्ये लस उद्योग गुंतवणूकीसाठी मांडला विचार

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी दावोस येथे लस उद्योगासाठी एक धाडसी आवाहन केले, वाढ आणि नवोपक्रम सक्षम करण्यासाठी योग्य किंमत नियमांचे आवाहन केले. “आपल्या उत्पादनांची योग्य किंमत ठरवण्यासाठी आपल्याला एकटे सोडले पाहिजे,” पूनावाला यांनी बिझनेस टुडेचे कार्यकारी संचालक राहुल कंवल यांना सांगितले, लस क्षेत्राला प्रोत्साहन किंवा ब्रेकची …

Read More »

उच्च न्यायालयात अहवाल सादर, अक्षय शिंदे चकमक प्रकरणी पाच पोलिस दोषी पाच पोलिसांवर खटले दाखल करण्याचे आदेश

बदलापूर शाळेतील कथित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यास बनावट चकमकीत मृत्युमुखी पाडलेल्या शिंदे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महादंडाधिकाऱ्यांमार्फत चकमकीची चौकशी करण्याचे आदेश आदेश दिले होते. त्याचा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. त्यात या चकमक प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना जबाबदार धरले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती …

Read More »

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर पोहोचले UIDAI आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आधार संवाद आयोजित

आधारद्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील ५०० हितधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात आधारच्या विविध उपयोजनांवर चर्चा करण्यात आली. फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांचा ऐतिहासिक उच्चांक आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनी १०० कोटींचा …

Read More »

परभणी लाँगमार्च ची मुंबईत जोरदार तयारी मुंबईत ठिकठिकाणी बैठका, आज वरळीत बैठक

सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत . परभणीतून यासंदर्भांत निघालेला लॉन्ग मार्च लवकरच मुंबईत धडकणार असून सदर मोर्चाची मुंबईत देखील ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये उद्या मंगळवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक राज्याबद्दल आपण जास्त काही न बोलेलं बरं

राज्यातील कायदा व सुव्यवस्था चिंताजनक आहे. ज्या राज्यात मंत्री असणारीच लोक जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर लोकं उतरवतात. पालकमंत्री पदासाठी राज्यात जाळपोळ होते. अशा राज्याबद्दल आपण जास्त काही न बोलेलं बर आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई प्रसार …

Read More »

वंचितकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ५ लाख, तर वाकोडे कुटुंबियांना ५० हजारांची मदत फुले - शाहू- आंबेडकरी जनतेने सूर्यवंशी कुटुंबियांना मदत करावी

परभणी प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आहे. त्याचबरोबर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सरकारने कुठलीही …

Read More »

राहुल शेवाळे यांचे वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर, येत्या २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २३ जानेवारीला मुंबईत सत्कार सोहळा

शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले की, उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून येत्या २३ जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होईल. त्यामुळे धास्तावलेले विरोधक शिवसेनेबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. उदय कोणाचा होणार यावर चर्चा करण्यापेक्षा उबाठा गटाच्या अस्ताबाबत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेंना संपवून नवीन ‘ उदय ‘… भाजपाच्या आर्शिवादाने ३.० शिंदेंनंतर उदय

महायुती सरकार मधील नाराजी नाट्य संपत नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून आपल्या गावी गेले आहेत. शिंदे यांची गरज भाजपसाठी संपली आहे का? उध्दव ठाकरे यांचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना आणले तसे शिंदे गटात नवीन ‘ उदय ‘ पुढे येईल असे सूचक विधान काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार …

Read More »

सप्टेंबर २०२४ पासून रिक्त असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदी दिनेश वाघमारे राज्य सरकारकडून नोटीफिकेशन जारी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची जबाबदारी पार पाडणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदी युपीएस मदान यांच्या निवृत्तीनंतर रिक्त पदावर आयएएस अधिकारी दिनेश वाघमारे यांची आज नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२४ रोजी सनदी अधिकारी युपीएस मदान हे निवृत्त झाल्यानंतर त्या जागेवर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्याचा …

Read More »