Editor

केंद्रीय मंत्रिमंडळाची ८ व्या वेतन आयोगाला मान्यता मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी, १६ जानेवारी रोजी या निर्णयाची घोषणा केली. मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी, आयोग स्थापन करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. ही घटना २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अगदी आधी घडली आहे …

Read More »

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारचा ऐवजी आता मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकार

मागील काही वर्षापासून राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याला त्याची सेवा पूर्ण झाली असेल किंवा त्याच्या सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला असेल अशा आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त पदी करण्याचा अधिकार यापूर्वी राज्य सरकारला होता. मात्र आता अशा सनदी अधिकाऱ्याचे नाव सुचविण्याचे अर्थात शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांचा निकवर्तीय सईद खान यास दणका दोषमुक्तीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला

शिवसेना शिंदे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांचे निकवर्तीय तथा सहकारी सईद खान यांचा मनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून मुक्त करण्याचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. खान यांनी पडद्यामागे राहून भूमिका बजावली असून त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे विशेष न्यायाधीश ए. सी डागा यांनी १३ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात …

Read More »

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयातीत व्यक्तीचा फोटो जारी रात्री २.३० वाजता १२ व्या मजल्यावरून खाली उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीसोबत सैफ अली खानशी झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने सहावेळा चाकूने वार केले. यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झाला. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्ती कोठून आला, कोठे गेला …

Read More »

शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर …

Read More »

‘आर्टी’ मध्ये ही पुस्तके मिळणार ८५ टक्के सवलतीच्या दरात सामाजिक न्यायविभागाच्या आर्टीकडून विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध

महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक सिडबी (SIDBI) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक …

Read More »

नाना पटोले यांची टीका, सैफ अली खानवरील हल्ला कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी घटना हे सरकारचे अपयश, निष्क्रीय फडणविसांनी गृहमंत्रीपद सोडावे

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, त्या घटनेने मुंबई असुरक्षित म्हणता येणार नाही सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

बांद्रा येथील पाली हिल येथे राहत असलेल्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सैफ अली खान यांने त्या अज्ञात व्यक्तीस अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला. या घटनेनंतर राजकिय क्षेत्रातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला; मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर रात्री त्यांच्या घरात झालेला जिवघेणा हल्ला ही अत्यंत गंभीर घटना आहे. वांद्र्यासारख्या भागात अशा प्रकारची ही तिसरी घटना घडलेली आहे. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार व आता सैफ अली खानवरील हल्ला. सैफ अली खानवरील हल्ल्याने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे …

Read More »