Editor

दादाजी भुसे यांची माहिती, शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम दोन विद्यार्थी खाली पडून जखमी झाल्याने घेतला निर्णय

राज्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी शासनाचे स्पष्ट धोरण असून शाळा स्तरावर परिवहन समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा बस सुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तसेच  शालेय वाहतूक नियमांची तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे खासगी शाळेच्या व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटनेबाबत विधानसभा …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन, महाविद्यालयांतील अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ट्युशन फीवरही नियंत्रण

महाविद्यालयांमध्ये विविध नावांनी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने पावले उचलली असून, शुल्क नियामक प्राधिकरणाकडून आता ट्युशन फीबरोबरच इतर शुल्कांवरही नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भुसावळ (जि. जळगाव) येथील पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून जादा शुल्क आकारल्याबाबत विधानसभा सदस्य अस्लम शेख यांनी …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, मुंबईतील २०१४ च्या पात्र यादीतील पथविक्रेत्यांना तात्पुरती जागा देणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले आश्वासन

मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा  निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) उपलब्ध करून देण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात येतील अशी माहिती, मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहरात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी …

Read More »

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १६ उपक्षेत्रांवर आधारित सविस्तर अर्थसंकल्प विधानसभेत अर्थसंकल्प सादर

राज्याचे वित्तमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. तसेच हा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील प्रत्येक स्तंभाला ४ उपक्षेत्रात विभागले असून चार उपक्षेत्रांना पुन्हा  १६ उपक्षेत्रांवर आधारित हा अर्थसंकल्प तयार केला आहे. राज्याचा एकूण अर्थसंकल्प हा ७ लाख ६९ हजार ४६७ कोटींचा असून …

Read More »

अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या या घोषणा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला अर्थसंकल्प सादर

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधऩ झाल्याने राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडे अर्थ खाते असल्याने अजित पवार यांच्यानंतर अर्थ खाते कोणाकडे जाणार असा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीकडे अर्थ खाते कोणी सांभाळू शकणारे …

Read More »

सोनिया गांधी यांच्या लेखानंतर अखेर भारताकडून खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी राजदूत मोहम्मद फताली यांची घेतली भेट

इराणचे सर्वोच्च नेते तथा आणि मूळचे भारतीय असलेले अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल भारताने आज अखेर शोक व्यक्त केला.  परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत सरकारच्या वतीने इराणी दूतावासात शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी राजदूताला सहानुभूतीचा संदेश देखील दिला. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) जारी केलेल्या छायाचित्रात परराष्ट्र …

Read More »

कामगारांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘लेबर कोड’ अंतर्गत कंपन्या बंद करण्याचे अधिकार कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्यील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कंपनी बंद केली आहे. या प्रकरणात  मालकासह २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे केवळ नोटीस देऊन न थांबता, सुरक्षेच्या त्रुटी आढळल्यास थेट कंपनी बंद करण्याचे अधिकार नवीन कामगार कायद्यान्वये प्राप्त होणार आहेत. …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजना करणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजनासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून ठोस उपाययोजना करणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील  डोंबिवलीवरून कळवा येथे बारावीचा पहिलाच पेपर देण्यासाठी जात असताना मुंब्रा – कळवा स्टेशन दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहम कटारे या विद्यार्थ्याचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा …

Read More »

माधुरी मिसाळ यांचा इशारा, मुंबईत वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिला इशारा

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन गंभीर असून, बांधकाम प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मापन यंत्रे बसवणे, धूळ नियंत्रणाचे उपाय करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नात  दिली. मुंबईतील वायू …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग; ५९.६२ लाखांची तपासणी पूर्ण उर्वरित तपासण्या १५ पर्यंत तपासणी पूर्ण

राज्यातील सिकलसेल या आनुवंशिक आजाराविरुद्ध सुरू असलेल्या अभियानाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत ५९ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित तपासणी १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित …

Read More »