राजकारण

“बिनविरोध सरपंच जाहिर करताय” निवडणूक आयोगाची मान्यता घेतली का? सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश- आयुक्त मदान

मुंबई : प्रतिनिधी सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. सरपंचपदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रकमेची बोली लावण्यात येत आहे, अशी तक्रार आयोगाकडे आली आहे. ग्रामपंचायतींच्या …

Read More »

१० वी, १२ वीच्या परिक्षा होणार ऐन उन्हाळ्यात तारीख निश्चित नसली तरी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वी परिक्षा आता घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून १० वी च्या परिक्षा मे नंतर तर १२ वी परिक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोना लॉकडाऊनमुळे शैक्षणिक कामकाज म्हणावे तसे सुरु झाले नाही. त्यातच ऑनलाईन पध्दतीने …

Read More »

औरंगाबाद नामांतरप्रश्नी अजित पवारांचे मोठे वक्तव्य… तिन्ही नेते बसून तोडगा काढतील

नाशिक : प्रतिनिधी राज्यातील औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर नाव ठेवण्यावरून शिवसेना नेते आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणवर कलगीतुरा सुरु झाला असतानाच याप्रश्नी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री बसून तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर …

Read More »

मंत्री चव्हाणांच्या बांधकाम विभागातील बील घोटाळ्याची चौकशी करा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची मागणी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई विभागातील खोट्या बिलांच्या नावाखाली झालेल्या  घोटाळ्याची चौकशी न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. बांधकाम विभागातील …

Read More »

धक्कादायक: बलात्काराची तक्रार केलेल्या महिलेलाच ग्रामपंचायतीने काढले गावाबाहेर भाजपाच्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

मुंबई : प्रतिनिधी साधारणत: पाच वर्षापुर्वीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेने आरोपींविरोधात निकराचा लढा देतं त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला याचा राग धरून ग्रामपंचायतीने या महिलेलाच गावाबाहेर काढण्याचा ठराव केल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील पाचेगावात घडल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली असून सदर ग्रामपंचायती विरोधात कारवाई …

Read More »

शिवसेनेला विरोध करत मुंबईपाठोपाठ औरंगाबादेतही काँग्रेसचा स्वबळाचा नारा मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही.  औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी कामाला लागा, पक्ष सर्वतोपरी मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा …

Read More »

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी राज्य सरकार करणार शिफारस सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज  सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. …

Read More »

कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे, त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळी चौकशी केली नाही. तर काहींच्या घरी औषधं सापडली त्यांचीही चौकशी केली. …

Read More »

सीबीआय काही करू शकत नसल्याने ईडीचा वापर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भाजपावर टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने  सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नसल्याची टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा २९ व ३० डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे समित्यांना निर्देश

पुणे: प्रतिनिधी ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन …

Read More »