महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. वर्षा निवासस्थानी आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते, …
Read More »बीडी कामगारांच्या थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश
किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे बीडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित …
Read More »मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहवालच सादर केला बीड जिल्हा प्रशासनाचा महसूल मंत्री कार्यालयाला प्राप्त अहवालच उत्तरा दाखल केला जाहिर
राज्यातील कुणबी समाजातील नागरिकांना मराठा ओबीसीचे प्रमाणपत्र न देण्याबाबतचे एक पत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड आणि इतर महसूल विभागीय कार्यालयाला पाठवले असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे आंदोलन कर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्या चुकीच्या कृत्याची भरपाई आता राज्य सरकारने करावी अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यावर …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन ११ ऑगस्टला खात्यात जमा होणार दर महिन्याला होणाऱ्या ७ तारखेऐवजी आता ११ ऑगस्ट होणार जमा
दर महिन्याच्या ७ तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसे लांबले. मात्र, एसटी महामंडळाच्या तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन उद्या, ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी
महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘द गव्हर्नन्स चॅलेंज टीजीसी २०२६’च्या चौथ्या पर्वाची राज्य शासनाने घोषणा केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतातील राज्य शासन व्यवस्थेवर केंद्रित पहिली राष्ट्रीय …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मंत्रिमंडळ व विधिमंडळाचा प्रस्ताव सादर करूनही मोदी सरकारकडून दि बा पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ नाव देण्यास विलंब, स्थानिकांमध्ये नाराजी व संताप
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त नागरिक आणि मूळचे आगरी-कोळी समाजबांधव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करत आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी (विधानसभा व विधान परिषद) २९ जून २०२२ रोजी एकमताने …
Read More »सुप्रिया सुळे यांची माहिती, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घेणार जंतर-मंतरवरील आंदोलनाची SIT चौकशी करा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील सर्व आठही खासदार आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी रीतसर वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते केवळ एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीचे फोटोही आम्ही तुम्हाला नक्की देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …
Read More »उदय सामंत यांची माहिती, समृद्ध मराठी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्कृतीला जागतिक व्यासपीठ दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांशी संवाद
मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज …
Read More »अमित शाह यांची घोषणा, महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय …
Read More »प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने घेतले जातात, असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट करत, “मी प्रॅक्टिकल राजकारणी आहे. मला रणनीतीकार किंवा …
Read More »
Marathi e-Batmya