राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत एकूण ९ निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये केंद्र पुरस्कृत ‘अबर्न चॅलेंज फंड’ अभियान राज्यात राबविणार, बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या २४.९५ कोटींच्या कामांना मान्यता, अपराधी परिविक्षा अधिनियमांतर्गत कैदेतील बंदींजनांच्या पुनर्वसन अर्थ सहाय्यात २५ हजार रुपयांची वाढ, एसटीच्या जागांच्या विकासासाठी पीपीपी धोरणातून सवलत, गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा …
Read More »महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींना मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत सुरु करण्यासाठी मुद्रीकरण धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळविता येईल, अशा मुद्रीकरण (Asset Monetisation) धोरणास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागा, इमारती, व्यावसायिक संकुले, बाजारपेठा, सार्वजनिक सुविधा, तसेच इतर …
Read More »माधुरी मिसाळ यांचे निर्देश, नगरपरिषद व नगरपंचायतीतील सेवाप्रवेश नियमांचा प्रस्ताव तातडीने सादर करा सेवाप्रवेश नियम सुधारण्यास गती, रिक्त पदभरती आणि बदली धोरणावर शासन सकारात्मक
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलत सेवाप्रवेश नियम संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अन्वये सुधारित करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. नगरविकास राज्यमंत्री माधुरी …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, स्मार्ट प्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’बाबत तातडीने कार्यवाही करा आढावा बैठकीत दिले निर्देश
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध उपप्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’ मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत चंद्रपूर येथील साखरवाही शेतकरी उत्पादक कंपनी (ता. चंद्रपूर) यांना मंजूर प्रकल्प कापूस जिनिंग या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, राम मंदिरावर दरोडा टाकणाऱ्यांना संघातून निष्काशित करण्याची हिम्मत आरएसएसने दाखवावी राज्यात दुबार पेरणीचे संकट, दुष्काळाशी मुकाबला करण्याचे सरकारचे नियोजन नाही, बोगस बियाणांप्रमाणे बोगस सरकारचा बोगस कारभार
अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. दरोड्यावर आता आरएसएस मधून नाराजी व्यक्त केली जात आहे पण नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना …
Read More »आदिती तटकरे यांचे निर्देश, ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करा महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी
राज्यातील महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईतील विविध संस्थांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास आयुक्त जगदीश मिनियार, विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार तसेच गिरासे उपस्थित होते. सर्वप्रथम मंत्री आदिती तटकरे यांनी केईएम, …
Read More »आकाश फुंडकर यांची माहिती, श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये सामंजस्य करार, उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्याधारित अभ्यासक्रमांना चालना
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला या करारामुळे नवी गती मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले अभिनंदन
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकूण २,४३० दिवस या पदाची सूत्रे हाताळल्याने सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेतृत्वाच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. शरद पवार यांना पाठी टाकत ते या क्रमांकावर पोहोचले आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे आणि २२१ दिवसांचे म्हणजेच एकूण २,४१२ दिवसांचे कामकाज हाताळले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी, शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड निर्माण करा शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी हे अभियान अभिनव ठरेल
शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी नगर विकास …
Read More »
Marathi e-Batmya