Tag Archives: भाजपा

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव… मराठी बोलणारे हिंदू नाहीत का? हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपाचा अजेंडा, हिंदी भाषा सक्तीला काँग्रेसचा विरोध

मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेस …

Read More »

मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे आव्हान, हिंदी लादली जाणार नाही याची हमी देणार का? पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काय वक्तव्य करत होते तेव्हा ते रडत नव्हते का ?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल, २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र सरकारकडून निधी मागितल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या विधानांची आठवण करून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हमी देऊ शकतील का की सीमांकनामुळे तामिळनाडूचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही, राज्याला एनईईटी NEET च्या कक्षेतून सूट दिली जाईल आणि …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, काँग्रेस मोर्चावर फडणवीस सरकारकडून दडपशाही खासदाराला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर गृहमंत्र्यांनी माफी मागावी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घाबरून मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजपाच्या तानाशाही कारभाराविरोधात मुंबईतील ईडी ED कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसकडून शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना फडणवीस सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. मला आणि …

Read More »

रावसाहेब दानवे यांची टीका, काँग्रेसचे आंदोलन बेगडी, काँग्रेसला मालमत्ता लुटण्याचा अधिकार नाही नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपाचे टीकास्त्र

नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. काँग्रेसला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र कोणाचीही जमीन आणि निधी लुटण्याचा अधिकार …

Read More »

रविंद्र चव्हाण यांचा विश्वास, रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजपा होणार शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी बुधवारी जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात …

Read More »

राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपा आणि आरएसएसला काँग्रेसचे पराभूत करू शकतो गुजरात विरोधकांसाठी महत्वाचे राज्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (१६ एप्रिल २०२५) म्हटले की, गुजरातमध्ये पक्षाचे कार्यकर्ते निराश दिसत असले तरी, केवळ त्यांचा पक्षच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपाला पराभूत करू शकतो. एका आठवड्यात दुसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर असताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिमेकडील राज्यात जवळजवळ ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या आरएसएस …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, भाजपाने मुस्लिम व्यक्तीला पंतप्रधान किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करावे फडणवीस, अजित पवार व शिंदेंची मोदींकडे पत असेल तर विशेष पॅकेज आणून राज्याची आर्थिक घडी रुळावर आणावी

काँग्रेसचे आजपर्यंत ८९ अध्यक्ष झाले, त्यात सर्व जाती धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, एससी, एसटी, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे नेते होते. काँग्रेसने विकासाची कामे करताना त्याची फळे सर्व जाती धर्माला मिळावीत हेच पाहिले पण आता भाजपावाले त्यांना मुस्लिम समाजाची खुप काळजी असल्याचे दाखवत आहेत.  मुस्लिम महिलांच्या हितासाठी तीन तलाक व गरिब मुस्लिमांसाठी वक्फ बोर्ड कायदा आणला …

Read More »

२०२३-२४ मध्ये कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला? निवडणूक आयोग आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म्सची माहिती

२०२३-२४ मध्ये, इलेक्टोरल ट्रस्टने राजकीय पक्षांना सर्वात मोठी रक्कम दान केली असताना, निवडणूक आयोगाने (EC) प्रकाशित केलेल्या आणि अलीकडेच असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) द्वारे संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, पायाभूत सुविधा आणि फार्मास्युटिकल कंपन्या पुढील सर्वात मोठ्या देणगीदार होत्या. या कंपन्यांपैकी, किमान पाच कंपन्यांच्या विविध केंद्रीय एजन्सींच्या चौकशीला सामोरे जावे लागत …

Read More »

चंद्रकात पाटील म्हणाले, त्यांना सत्तेत यायचं… संजय राऊत यांचे प्रत्युत्तर अमित शाह… चंद्रकांत पाटील यांच्या चिमट्यावर संजय राऊत यांचा खोचक टोला

लोकसभा निवडणूकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत मात्र भाजपाप्रणित महायुतीला भरघोस जागा मिळाल्या. त्यानंतर त्यानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन ते चार वेळा विधान भवनात भेट झाली. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मोदीजी, सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद व अशोभनीय

संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल काँग्रेस …

Read More »