Tag Archives: ncp

आम्ही विदर्भाला पैसे दिलेच पण पश्चिम महाराष्ट्रालाही पूर्ण निधी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर

सांगली-पलूसः प्रतिनिधी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात डझनभर मंत्री होते. विदर्भाचा अनुशेष म्हणून तिकडे पैसे द्यावे लागतात असे सांगून ते पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना निधी देत नव्हते. आम्ही सत्तेवर आल्यावर विदर्भाला तर निधी दिलाच पण पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू- ताकारी – म्हैसाळ अशा सर्व योजनांसाठी पूर्ण निधी …

Read More »

पवारांच स्टेटमेंटच मुख्यमंत्र्यांना कळलं नाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते - नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना ते स्टेटमेंटच कळलं नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. पवारसाहेब म्हणाले होते की, पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोकं स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण …

Read More »

मोदी – फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत डंका पिटतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत विकास आम्हीच करत आहे असे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री पियुष …

Read More »

भाजपा-सेनेतील नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात, पण मुख्यमंत्र्यांमुळे नावे जाहीर करणार नाही दिक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांना वंदन करून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात

नागपुर: प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षातील अनेक लोक शिवसेना आणि भाजपात जात आहेत. परंतु सेना – भाजपात गेली तीन – चार वर्षे निवडणूक लढवण्याकरीता काम करणारे लोक दुखावले आहेत. अशी दुखावलेली मंडळी माझ्या संपर्कात असून त्यांची नावे जाहीर करणार नाही. कारण मुख्यमंत्री साम-दाम-दंड भेदाचे सूत्र वापरण्यात माहीर असल्याने त्यांची योग्य वेळी नावे …

Read More »

प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो सांगून टिव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असे जाहीर केले. …

Read More »

देशात मंदी असताना मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करण्यात मश्गुल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी देशात १०० टक्के आर्थिक मंदी असताना देशाचे पंतप्रधान मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करून सरकारचे १०० दिवस साजरे करण्यात मश्गुल आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मोदी सरकारचे १०० दिवस यावर बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला. देशातील …

Read More »

भाजपातली मेगाभरती ही कारवाईच्या धाकापोटीच नेत्यांच्या संस्थामधील भ्रष्टाचाराचा मेगाभरतीसाठी आधार

मुंबईः प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील आजी -माजी खासदार आमदार आदी भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र या प्रत्यक्ष पक्ष प्रवेशामागे त्या त्या नेत्यांच्या संस्थांमध्ये सदरच्या नेत्यांनी केलेल्या लाखो-करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारी यंत्रणेच्या हाती आल्याने या पुराव्याच्या आधारे कारवाईचा धाक दाखवित मेगाभरतीचे आमंत्रण देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

आर्थिक मंदी नाही तर भाजप नेत्याने स्वतः च्या कंपनीतील ४०० जणांना का काढले? राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या भोवऱ्यात सापडली आहे. तरीही केंद्र सरकार आणि भाजपाकडून देशात मंदी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग देशात मंदी नाही तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या कंपनीतील ४०० जणांना का काढले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी …

Read More »

मोठा भायने बोलू चे, युती ना करवा छे शिवसेनेने सोबत युती न करण्याचे भाजपा नेत्यांचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबर झटपट युती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच युतीची काळजी विरोधकांनी अथवा प्रसारमाध्यमांनी करू नये असे आवाहनही केले. मात्र निवडणूकीत प्रत्यक्ष शिवसेनेबरोबर कोणत्याही स्वरूपात युती करायची नाही असे स्पष्ट आदेश दिल्लीतील भाजपाच्या मोठा भायने राज्यातील नेतृत्वाला दिल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सुत्रांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, निवडणूकीत लढाई फक्त वंचित सोबतच नांदेड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्य़ाचे वक्तव्य

नांदेड-मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या विरोधकांना विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळणार नसल्याचे काही तासांपुर्वींच जाहीर करून काही तासांचा अवधी उलटत नाही तोच विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला रामराम ठोकत …

Read More »