मुंबई: प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना एकूण बाधितांची संख्या आता ३ लाखाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक बाधित रूग्ण होते. आता मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर असून आजस्थितीला २ लाख ९९ हजार ३२६ इतकी एकूण बाधितांची संख्या झाली आहे. तर मागील २४ …
Read More »राज्यात या तारखेपासून होणार कोरोना लसीकरणाला सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश
मुंबईः प्रतिनिधी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली, त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या …
Read More »कृषी कायदे मागे घ्या नाहीतर…सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दट्या शेतकरी आंदोलन हाताळण्याच्या केंद्राच्या पध्दतीवर नाराज
नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध कायम आहे. केंद्रानं दुरूस्ती करण्याची तयारी दर्शवली असली, तरी शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून दिल्लीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी …
Read More »देशातील पहिल्या समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा मुंबईत शुमारंभ 'मावळा' टीबीएम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा …
Read More »माजी मंत्री मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीला धन्यवाद देत लगावला हा टोला सुरक्षा कपातीवरून सरकारला लगावला टोला
मुंबई-चंद्रपूर: प्रतिनिधी राज्यातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याबरोबरच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेत कपात करण्यात आली. या कपातीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला धन्यवाद देत नक्षलवाद संपलेला दिसतोय असा उपरोधिक टोला लगावला. विशेष म्हणजे भाजपाकडून सुरक्षा कपातीच्या निर्णयावर …
Read More »कोरोना : चार दिवसांपूर्वी ५० च्याखाली गेलेली बाधित संख्या पुन्हा ५५ हजाराकडे ३ हजार ५५८ नवे बाधित, २ हजार ३०२ बरे झाले तर ३४ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या चारच दिवसांपूर्वी ५० हजाराहून खाली ४८ हजारापर्यंत घटली होती. मात्र आता त्यात पुन्हा वाढ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजाराच्या जवळ पोहोचली आहे. आज ३ हजार ५५८ इतके नवे बाधित आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५४ हजार १४५ इतकी झाली आहे. तर …
Read More »“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली असताना दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मला वैयक्तिक फोन करून माझी सुरक्षा काढून घ्या असे सांगितले. तसेच यासंदर्भात मला पत्रही लिहिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी …
Read More »फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची सुरक्षा कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीचा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे, अशी टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhey) यांनी केली. नुकतेच पोलिस …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंकडून भंडारा रूग्णालयाची पाहणी: पीडीत कुटुंबियांचे केले सांत्वन अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भंडारा: प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नागपूरहुन भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या …
Read More »ऐकावे ते नवलचं, जमिन बिगर आदीवासींच्या नावे करायचीय? मग पुष्पगुच्छ तयार ठेवा मंत्री कार्यालयाकडून आलेल्या जमिनीच्या फाईलीच आम्ही करतो
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी वनहक्क कायद्यान्वये आणि भारतीय राज्यघटनेतील तरतूदीनुसार ते कसत असलेली जमिन त्यांच्या नावावर करण्यात आली. परंतु मागील काही वर्षात वाढत्या शहरीकरणामुळे कधी काळी शहर हद्दीबाहेर असलेल्या वनजमिनी आता हद्दीत येवू लागल्याने आदिवासींच्या जमिनींना कोट्यावधींचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे या जमिनींची …
Read More »
Marathi e-Batmya