Editor

औरंगाबाद नामांतर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले शिवसेनेला ढोंगी म्हणे शिळ्या कढीला ऊत आणला जातोय

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरून धुराळा उठत असतानाच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नामांतरचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला चक्क ढोंगीपणाची उपमा देत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा …

Read More »

पहिल्या दिवशी ८ लाखापैकी इतक्या जणांना दिला कोरोना लसचा पहिला डोस सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी  लस  घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ …

Read More »

कोरोना: मुंबईतील कोरोनाबाधित ३ लाखापार मात्र अॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट २ हजार ९१० नवे बाधित, ३ हजार ३९ बरे झाले तर ५२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आज ३ लाखापार अर्थात ३ लाख २ हजार २२६ वर पोहोचली आहे. तर २ लाख ८३ हजार १३५ बरे झाले असून कोरोनामुळे आतापर्यत मृत्यू ११ हजार २३७ झाले असून अॅक्टीव्ह रूग्ण ६ हजार ९६६ आहेत. आज ३,०३९  रुग्ण बरे होऊन घरी, …

Read More »

नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अन्यथा आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष ‌चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार

मुंबई : प्रतिनिधी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे खुलासा करताना आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्माशी आपले विवाहबाह्य संबंध असून त्यातून दोन मुले जन्माला आल्याची व त्यांना आपण आपले नाव दिल्याची जाहीर कबुली दिली आहे. हे ध्यानात घेता, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, …

Read More »

… पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहतायत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप

नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतक-यांना उद्धवस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

आजचा दिवस क्रांतीकारक पण कोविड सेंटर असेच ओस राहो मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत आजही ते …

Read More »

लस वाटपातही केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्यायच लस साठा कमी आल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न देण्याचे काही थांबत नसून लस वाटपातही केंद्र सरकारकडून अन्याय झाला आहे. राज्यातल्या फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सना द्यावयाच्या लसीच्या निम्मा वाटाच केंद्राने पाठविला आहे. त्यामुळे राज्यातल्या फक्त ५ लाख वॉरियर्सना लस देणे शक्य होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्राला १७.५० लाख करोना …

Read More »

५ वी ते ८ वीच्या शाळा या तारखेपासून होणार सुरु शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन -२०२५ शिक्षणाचा रोड मॅप तयार करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांची कोविडबाबत काळजी घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूकीतील तब्बल २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी …

Read More »

पवारांचे संकेत, कायदेशीर कटकटीतूनही मुंडेंना मिळणार दिलासा पवार म्हणाले, मुंडे-शर्मा प्रकरणाची स्वतंत्र चौकशी

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात आणखी तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा …

Read More »