Editor

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या वयाच्या ३४ व्या वर्षीचा जगाचा घेतला निरोप

मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीत आताशा कुठे बस्तान बसत असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या बांद्रातील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत हा मुळचा बिहारमधील पाटण्याचा असून त्याचा जन्म …

Read More »

महाभारतात दुर्लक्षित राहीलेला “युयुस्तु” संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे विश्लेषण

महाभारत! भारतातील एक महत्वाचे महाकाव्य, सत्य की असत्य? रचलेले की घडलेले? माहीत नाही. पुराव्यावरून कदाचित होय घडलेले पण वास्तववादी विचार केला तर रचलेले. महाभारता बद्दल अनेक शंका कुशंका अनेकांच्या मनात आहेत. नाटकाच्या संदर्भात त्यातील व्यक्तिरेखांचे अनेक पैलू आपल्या पुढे येतात. महाभारतातील ‘व्यासाला’ आपण जर वसंत कानेटकर लिखित ‘ संगीत मस्त्यगंधा’ …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या केल्या..वाचा मदतीच्या निकषांमध्ये बदल, मासेमारांसह शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या!

मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेत कोकण दौर्‍याच्या अनुषंगाने तेथील अडचणींच्या १९ मागण्यांचे एक निवेदन त्यांना सादर केले. देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस कोकणाचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणांना भेटी देऊन नुकसानीचा …

Read More »

कोरोना: २१ दिवसानंतर पुन्हा राज्यात ५१ हजार अॅक्टीव्ह रूग्ण आजही १०० हून अधिक मृत्यू तर ३ हजाराहून अधिक रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने एकूण रूग्णांच्या संख्येतून बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार २४ मे २०२० रोजी राज्यात एकूण ५० हजार २३१ रूग्ण होते. आज पुन्हा २१ दिवसांनी ५० हजार अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पार करत …

Read More »

अंदाज खरा ठरला ! मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस दुपारनंतर मान्सूनची हजेरी

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महानगरात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी हवामान खात्याने १२ आणि १३ तारखेला मान्सूनच्या सरी मुंबई, पुणे येथे कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. मुंबईत शहरातील बहुतांष भागात पावसाने दुपारी हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र नंतर …

Read More »

पहिला रूग्ण सापडण्याआधीच पंतप्रधानांना कोरोना संकट माहित होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडण्याआधी या संसर्गजन्य आजाराची आणि यामुळे निर्माण होत असलेल्या संकटाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मादी यांना होती असा गौप्यस्फोट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. जावडेकर हे ११ जून रोजी सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमध्ये ऑनलाईन जनसंवाद रॅलीला संबोधित करत होते. तसेच या …

Read More »

शिशू वर्ग ते १२ वी पर्यंतच्या ८५% पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता 'लीड स्कूल' सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुंबई : प्रतिनिधी सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आजाराच्या साथीमुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागली आहे. या सर्वेक्षणातून असे निष्पन्न झाले आहे की, कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या …

Read More »

आता कोरोना चाचणी २२०० रूपयांत होणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले. …

Read More »

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट द्या वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

पुणे: प्रतिनिधी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता त्यांना अग्नी द्यायचा असतो, मात्र अग्नी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांना संरक्षण साधन (पीपीई किट) नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

Read More »

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला वित्तमंत्री कोण ? याची माहितीच नाही शासन निर्णय निघाला वित्तमंत्र्यांच्या नावे मात्र समितीच्या अध्यक्षपदी भुजबळांचे नाव

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती किंवा सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून दिली जाते. मात्र राज्याचे वित्त अर्थात अर्थमंत्री नेमके कोण याचा विसर या विभागाला पडला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने नेमके अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कि अन्न व नागरी पुरवठा …

Read More »