Editor

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी या अभिनेत्रीला दिला घरात आसरा लॉकडाऊनमुळे मराठी अभिनेत्रीला मदतीचा हात

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढणा-या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढलेला असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जनतेसाठी माणुसकीचा धर्म बजावत आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू- जेवण देण्यासह त्यांनी आपल्या घरी जाऊ न शकलेल्या जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना १५ एप्रिलपासून आपल्या घरात आसरा दिला. धुमधडाका या चित्रपटासह अनेक मराठी …

Read More »

नांदेड, रायगड, औरंगाबादेत अडकलात, तेथून मूळ गावी जायचेय ? तर हे वाचा जिल्हा प्रशासनाकडे कसे अर्ज सादर करायचे आणि कोठे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध भागातून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू आदी अडकलेले आहेत. सद्यपरिस्थितीत नांदेड, रायगड आणि औरंगाबाद येथे अशा अडकलेल्यांनासाठी त्या त्या स्थानिक प्रशासनाने वेबसाईटची लिंक आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यानुसार आपला अर्ज आणि फोनवरून संपर्क साधून आपल्या मूळ गावी जावू शकता. नांदेड जिल्ह्यातील …

Read More »

फडणवीस सरकारने केली महाराष्ट्राची घोर फसवणूक! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात राज्याला पुढे आणण्याचा अट्टाहास लपून राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहत नाहीत हे स्पष्ट आहे. परंतु गुजरातचे महत्त्व वाढण्याकरीता महाराष्ट्राच्या हितांना मुठमाती देण्याइतपत तत्कालीन फडणवीस सरकारची मजल जाईल असे कधीच वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत प्रस्तावित असताना ते गुजरातला …

Read More »

महसूल विभागाला झाली घाई, मंत्रालयाचे कामकाज बंद असताना काढले आदेश जानेवारीतल्या पदोन्नतीची पदस्थापना ३० एप्रिलला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या संकटाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बहुतांष मंत्री, शासकिय कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता दोन हात करत आहे. मात्र राज्याच्या महसूल विभागाला मात्र पदोन्नती दिलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पद स्थापना (पोस्टींग) देण्यासाठी मंत्रालयाचे कामकाज सुरू होण्याची वाटही बघाविशी वाटली नाही. उलट जंतूनाशक फवारणीसाठी मंत्रालय बंद ठेवण्याचे आदेश असतानाही …

Read More »

मुंबई-पुण्यात यायचंय-जायचंय? अजिबात विचार करायचा नाही बाकीच्या रेड झोनमधील प्रवेशाचा निर्णय पोलिस आयुक्तांकडे

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटक यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी प्रवासाची मूभा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आंतरजिल्हा प्रवासासही मूभा दिली. मात्र मुंबई महानगरातून बाहेर जायचंय किंवा यायचंय तर अजिबात विचार करायचा नाही. या महानगरातून बाहेर जाण्यासाठी किंवा येण्यासाठी कोणतीही परवानगी न देण्याचा निर्णय राज्य …

Read More »

जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? 'कम्युनिटी किचन' केंद्रावर मंत्री जयंत पाटील झाले 'वाढपी'

सांगली-मुंबई: प्रतिनिधी ज्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून इस्लामपूर शहरातील गोरगरिबांना गेल्या १५-२० दिवसापासून ‘माणुसकीची थाळी’ भरविली जात आहे ते राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील ‘कम्युनिटी किचन’ना आज भेटी दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? असा गरजूंशी संवाद साधत काही केंद्रावर …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच २४ तासात १००८ नवे रुग्ण एकूण संख्या ११ हजार ५०६ तर १८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात सर्वाधिक १००८ रूग्णांचे निदान झाले असून गेल्या ५१ दिवसात एकादिवसात इतक्या रूग्णांचे निदान होण्याची ही पहिलीच वेळ असून १०६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली पोहोचली असून ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू …

Read More »

आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन : परतणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी देशभरातील २ रा लॉकडाऊनचा टप्पा संपायला अवघे दोन दिवस शिल्लक राहीलेले असताना ४ ते १७ मे दरम्यानच्या तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तसेच स्थलांतरीत कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या इच्छित स्थळी अर्थात मुळ गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वे मंत्रालयाने गृह …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह महा आघाडीचे ५ आणि भाजपाचे ४ उमेदवार रिंगणात काँग्रेसमधून खान, सावंत, हुसेन तर भाजपातून तावडे, मुंडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राजकिय स्थिरता आणण्याच्या उद्देशाने विधान परिषदेची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विद्यमान उपसभापती अॅड.नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित सांगण्यात येत आहेत. तर काँग्रेसकडून दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पाच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. भाजपाकडून चार …

Read More »

राज्यातील सर्वांवर मोफत उपचार : खाजगी रूग्णालयांच्या मनमानीस लगाम महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट

मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर करत राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही …

Read More »