Editor

भारताकडून मालदीवला करण्यात येणाऱ्या मदतीत २८ टक्क्यांची वाढ मालदीवच्या सुधारीत भूमिकेनंतर अर्थसंकल्पातील मदत वाढविली

राजनैतिक तणावामुळे निर्माण झालेल्या गोंधळलेल्या वर्षानंतर, भारताने २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मालदीवला देण्यात येणाऱ्या विकासात्मक मदतीत लक्षणीय वाढ केली आहे. २०२४ मध्ये द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावपूर्ण परिस्थितीमुळे निधीत मोठी कपात झालेल्या या बेट राष्ट्राला आता मदत वाटपात जवळपास २८% वाढ दिसून येत आहे. उच्चस्तरीय संबंधांमुळे आणि भारताच्या शेजाऱ्यांवरील धोरणात्मक लक्ष अधोरेखित …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने मोठ्या खंठपीठाकडे ती महत्वपूर्ण याचिका पाठवली पोक्सो, मकोका किंवा एनडीपीएस कायद्याखाली दाखल गुन्ह्याचे कारण लेखी स्वरूपात देण्यासंदर्भात प्रकरण

पोक्सो कायदा, मकोका किंवा एनडीपीएस कायदा यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटकेचे कारण लेखी स्वरूपात सादर करावे की नाही, हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठ्या खंडपीठाकडे पाठवला. सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेचे कारण लेखी स्वरूपात सादर केले पाहिजे …

Read More »

केंद्र सरकारकडून खाजगी उद्योगांना आधार कार्डचे ऑथेन्टीकेशन घेण्यास परवानगी सेवा मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यास दिली मान्यता

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आधार (वित्तीय आणि इतर अनुदाने, फायदे आणि सेवांचे लक्ष्यित वितरण) कायदा, २०१६ अंतर्गत सुशासनासाठी आधार प्रमाणीकरण (समाज कल्याण, नवोन्मेष, ज्ञान) सुधारणा नियम, २०२५ अधिसूचित केले आहे. या सुधारणामुळे सरकारी आणि गैर-सरकारी अर्थात खाजगी अशा दोन्ही संस्थांना विविध सेवा प्रदान करण्यासाठी आधार प्रमाणीकरण सेवा मिळविण्यास …

Read More »

अर्थसंकल्पाच्या तोंडावर जानेवारीत जीएसटी संकलनात वाढ वार्षिक आधाराच्या तुलनेत १२.३ टक्के वाढ

जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन १.९६ ट्रिलियन अर्थात भारतीय रूपयांमध्ये १,९५,५०६ कोटी रुपये इतके झाले आहे, जे वाढत्या देशांतर्गत आर्थिक घडामोडींमुळे वार्षिक आधारावर १२.३ टक्क्यांनी वाढले आहे, असे सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात शनिवारी वित्त विभागाने यासंदर्भातील माहिती जाहीर केली. मागील महिन्यासाठी, भारताचे जीएसटी संकलन मागील आर्थिक …

Read More »

अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी बिहारसाठी काय काय दिले? बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिली आश्वासने

शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारने प्रमुख भूमिका बजावली. कारण त्यांनी बिहार राज्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली. नवीन मखाना बोर्ड, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थांची घोषणा करण्यात आली. याशिवाय, पाटणा विमानतळाच्या विस्तारासोबतच ग्रीनफिल्ड विमानतळे जोडली जातील आणि मिथिलांचलमधील पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाचीही घोषणा …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांची खोचक टीका,… सहनशक्ती वाढविणारा… कृषी क्षेत्राला वाऱ्यावर सोडले, डॉलर विरूद्ध रूपयाबाबत काहीच नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र सीतारामण यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यांचे तुष्टीकरण करणारा व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी अर्थसंकल्पावर केली. दिल्लीत संसदेत अर्थसंकल्प सादर …

Read More »

प्रजासत्ताक दिनी विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप

नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये अनेक वैयक्तिक तसेच सांघिक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे निमंत्रित करून शाबासकी दिली. महाराष्ट्र एनसीसीने आजवर १७ वेळा प्रतिष्ठित असे पंतप्रधानांचे निशाण पटकावले आहे, अनेकदा राज्य एनसीसी संचालनालय द्वितीय क्रमांकावर आली आहे. यंदा अनेक …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा… देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेल, कारण १२ लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने सर्वसामान्याना मोठा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख पण मुंबई व महाराष्ट्राच्या… भाजपा सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आघाडी सरकार वाचवण्यासाठी केलेली धडपड

भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा …

Read More »

अर्थसंकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. …

Read More »