पुणे : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर नगरपालिका या यामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे व किमान वेतनाचा फरक देण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने दुरदृश्य प्रणालीद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली. यामध्ये डॉ.गोऱ्हे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून त्यांचा फरकही तात्काळ देण्यात यावा. तसेच सामाजिक …
Read More »केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस मंत्री वडेट्टीवारांकडून स्वागत ओबीसी विद्यार्थ्यांनाही आता मिळणार सैनिकी शाळेत आरक्षण मिळणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशातील सैनिक शाळांमध्ये ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावी अशी मागणी देशभरातून करण्यात येत होती. अखेर या मागणीचा समावेश केंद्र सरकारने केला असून सैनिक शाळांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पूर्व परिक्षेच्या आदेशात ओबीसी समाजालाही २७ टक्के आरक्षण देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली असून केंद्राच्या निर्णयाचे काँग्रेसचे मंत्री विजय …
Read More »ST कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी महामंडळाचा असाही विचार परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन दिवाळीपूर्वी देणे ही सध्याची प्राथमिकता असून प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. ते पुढे म्हणाले की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचे उत्पन्न घटले आहे. परंतु अशा परिस्थितीत …
Read More »कोरोना : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या कमी ६ हजार १९० नवे बाधित, ८ हजार २४१ बरे झाले तर १२७ मृतकांची
मुंबई: प्रतिनिधी राज्यात दैंनदिन बाधित रूग्णांची घट होणाऱ्या जिल्ह्यांची संख्या वाढत असून यामध्ये प्रामुख्याने मुंबई-ठाणे विभागातील उल्हासनगर, भिवंडी, पालघर या शहरांचा समावेश आहे. तर नाशिक विभागात मालेगांव, धुळे, जळगांव, नंदूरबार शहरांमध्ये आतापर्यंतची सर्वात कमी रूग्ण संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. तर पुणे विभागात सोलापूर आणि पुणे शहरांमध्ये पूर्वीच्या …
Read More »शरद पवारांनी सांगितले, होय मला राजचा फोन आला…. राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला पवारांना फोन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वीज ग्राहकांना येत असलेल्या वाढीव वीज बिलाच्यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच भेट घेतली. परंतु त्यांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज फोन केल्याची माहिती दस्तुरखुद्द पवार यांनीच दिली. मात्र भेटीबाबत …
Read More »स्वतंत्र भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या लढ्याला महाविकास आघाडीकडून सोबतीचे आश्वासन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र
मुंबई : प्रतिनिधी भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ …
Read More »पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी अॅड.प्रकाश आंबेडकरांनी केला श्रीमंत मराठ्यांवर आरोप राज्य सरकारचाही केला निषेध
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत किती जागा भरल्या, किती रिक्त आहेत याची माहिती मागविलेली असतानाही ती जाणीवपूर्वक सादर केली जात नसल्याप्रकरणी यासाठी श्रीमंत मराठे जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी करत राज्य …
Read More »इंडियन ऑईलचा इंडेन गॅस बुक करायचाय? मग हा नवा नंबर डायल करा ग्राहकांसाठी देशभरात आता एकच बुकिंग नंबर
मुंबई : प्रतिनिधी सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइल तर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग साठी एक कॉमन नंबर जारी केला आहे. आता ग्राहक ७७१८९५५५५५ या नंबर वर गॅस सिलिंडर बूक करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24×7 उपलब्ध असेल. या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर बूक करता येऊ …
Read More »कोरोनाः बाधितांमध्ये घट तर घरी जाणारे वाढले ५ हजार ९०२ नवे बाधित, ७ हजार ८८३ बरे झाले तर १५६ मृतकांची नोंद
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून बरे होवून घरी जाणाऱ्या बाधित रूग्णांच्या संख्येत मात्र सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ५ हजार ९०२ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख ६६ हजार ६६८ वर तर अँक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २७ हजार …
Read More »भावी १२ आमदारांच्या नावावर मंत्रिमंडळाचे एकमत…पण नावे लखोट्यात बंद! नावांबाबत कमालीची गुप्तता
मुंबई : प्रतिनिधी गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाच्या प्रस्तावाला अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी ४ नावांबाबत तिन्ही पक्षांत अखेर एकमत होऊन सदर १२ नावांची यादी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. आज पार पडलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya