Editor

टीम जुनीच पण अजित पवार यांची खुर्ची…एकनाथ शिंदे यांचा टोला, तर अजित पवार म्हणाले…. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत संवाद

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार अशी टीका करत बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आवर्जून उपस्थित राहिले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, शेतकरी विरोधी, विसंवादी सरकार म्हणून चहापानावर बहिष्कार मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक

सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'परिवहन भवन’या नव्या इमारतीचे भूमिपूजन

राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावे, या दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस सुरुवात होत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. १ मार्च ‘परिवहन दिन’ या दिवसाचे …

Read More »

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे सरकारला पत्र, केवळ चहापानाचा फार्स अंबादास दानवे यांचा खडा सवाल, विसंवाद आहे म्हणायचे आणि संवादही साधायचा नाही

अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्यावतीने विरोधी पक्षातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत प्रथेप्रमाणे दरवेळी प्रमाणे राज्य सरकारने यावेळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र एकाबाजूला कायदेशीर तरतूदींचे पालन करायचे नाही दुसऱ्याबाजूला विरोधकांच्या सूचनांचा आदरही करायचा नाही मग …

Read More »

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे मृत्यूप्रकरणी मंत्रालयावर मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन

शहिद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी आज ३ मार्च सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर हजारोंच्या संख्येने राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी नागरिक धडकणार असून सर्व …

Read More »

आशिष शेलार यांचे आवाहन, लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा भायखळा येथील नाट्य महोत्सवात केली

मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यामध्ये काही दुमत नाही. पण त्यापुर्वी लोककला मधून नाटक या कलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरु आहेत. त्यामुळे याबाबत एक सर्वंकष अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. या कामी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य …

Read More »

उत्तराखंड हिमस्खलनात आणखी ३ जणांचे मृतदेह सापडलेः एक जण अद्याप बेपत्ता मृतांची संख्या आठवरः घटनास्थळी एकूण ५४ कामगार

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शुक्रवारी सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात आणखी तीन मृतदेह सापडले आहेत आणि एक कामगार अजूनही बेपत्ता आहे, असे लष्कराने रविवारी सांगितले. यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आठ झाली आहे. हिमस्खलन झाले तेव्हा घटनास्थळी ५४ कामगार होते. लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव म्हणाले, “शेवटच्या माणसाचा शोध …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, राज्यात जंगलराज, महिला- मुली सुरक्षित नाहीत… मुलींची छेड काढणा-यांच्या अटकेसाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनात जावे लागते ही सरकारसाठी शरमेची बाब

राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली, त्यांच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. आरोपींना अटक होत नाही म्हणून खडसे यांना पोलीस स्टेशनला जाऊन ठिय्या द्यावा लागतो, हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे निदर्शक आहे. राज्यातील …

Read More »

परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती, एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीनंतर दिली माहिती

काही दिवसांपूर्वी पुणे येथील बंद अवस्थेतील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षिय युवतीवर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे एसटी स्थानकातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. तसेच या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेण्यात आला. यावेळी एसटी स्थानकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून सुरक्षा रक्षकांची समिती स्थापन करून …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, एकास अटक सहाजणांच्या टोळक्याकडून छेडछाड, पोलिसांमध्ये तक्रार दाखल

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नात तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची सहा जणांच्या टोळक्याने छेड काढत छळ करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती पुढे आली असून सहाजणांपैकी एकास अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर भागात एका जत्रेत …

Read More »