Editor

कोरोना: राज्यात ७ हजार ७४ नव्या रूग्णांसह संख्या २ लाखावर ३३९५ जणांना घरी सोडले, २९३ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८३ हजारावर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्येचे शहर म्हणून आता ठाणे जिल्ह्याची नोंद करावी लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहराचे नाव घेण्यात येत होते. मात्र आज मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २४ हजार ९३६ तर ठाणे जिल्ह्यात २६ हजार ७२७ वर पोहोचली आहे. तसेच २४ तासात तब्बल ७ हजार ८३ इतके …

Read More »

सोलापूरकरांना पुरेशी माहिती दिल्यानंतर संचारबंदी चर्चा करुनच लॉकडाऊनबाबत निर्णय :पालकमंत्री भरणे यांची माहिती

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून संचारबंदी लागू केली जावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी पूर्ण चर्चा करुनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संचारबंदीबाबत शहरातील नागरिकांना पुरेशी माहिती अगोदर दिली जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज …

Read More »

पावसाळी साथ आजाराचा मुकाबला करत कोरोनाचे ट्रॅकींग- टेस्टींग ही वाढवा यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे …

Read More »

सायबर भामट्यांच्या “या” ऑनलाईन युक्त्यापासूनपासून सावध महाराष्ट्र सायबर विभाग नागरिकांना आवाहन- विशेष पोलीस महानिरीक्षक

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या आताच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने अनेक युक्त्याचा वापर सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या सायबर भामट्यांच्या कार्यपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या …

Read More »

मुंबईत १७ हजार जागांसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन मेळावे एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार जागापैकी पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र …

Read More »

अखेर टीकेमुळे आयसीएमआर करणार कोरोनावरील देशी औषधाची ट्रायल व्यक्तीबरोबर प्राण्यांवरही चाचणी करून लवकरच बाजारात आणणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी परदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येला मागे टाकत भारताने कधीच २ रा क्रमांक पटकावला. तरीही आयसीएमआर कडून कोरोनावरील देशी बनावटीच्या औषधाची ट्रायल करण्यासाठी मुहूर्त अर्थात १५ ऑगस्टपर्यतचा मुहुर्त शोधला. परंतु या धोरणावर देशातील सर्वस्तरातून टीकेची झोड उठताच अखेर आयसीएमआरने लवकरच कोरोनावरील औषधाची ट्रायल सुरु करणार असल्याचे जाहीर केले. देशातील कोरोनाबाधीतांच्या …

Read More »

गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिलांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्या ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. …

Read More »

अरविंद बनसोड प्रकरणात गावगुंडांची दमदाटी गृहमंत्र्यांचा दरारा नसल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

नागपूर: प्रतिनिधी हे प्रशासन कुचकामी असून जातीयवादी गुंडांवर यांचा वचक नसल्याने हे गावगुंड पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील अरविंद बनसोड हत्या प्रकरणातील आरोपींनी आता गावातील नागरिकांना दमदाटी करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या विरोधात कोणीही साक्ष देऊ नये म्हणून गेले पंधरा दिवस गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात …

Read More »

पूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीप्रश्नी कर्नाटकच्या मंत्र्याशी चर्चा ७ जुलै रोजी दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री भेटणार

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागात असलेल्या नदीला पूर येवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे जलसंपदा मंत्र्यांची चर्चा होणार …

Read More »

मंत्र्यांचा आदेश, प्रस्ताव तयार करा! पण नेमका कशाचा? अधिकारी बुचकळ्यात धारावी, मानखुर्द, गोवंडीचा पुनर्विकास, पण झोपड्यांचा कि इमारतींचा

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन महिने मुंबईतील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रसारामुळे शहरातील झोपडपट्या आणि कमी आकारांच्या घरांचा प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांने गृहनिर्माण विभागाला तीन ओळीचे पत्र पाठवित धारावी, मानखुर्द, गोवंडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याचे सांगितले. मात्र त्या तीन ओळीच्या पत्रता …

Read More »