मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया परिक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करत जुलै महिन्यात परिक्षा घेण्यास सांगितले. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची परिक्षा आयोजित केली तर प्रत्यक्ष रूग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता जाणवेल. त्यामुळे या परिक्षा पुढे ढकल्यासाठी आपण हस्तक्षेप …
Read More »नवा सल्लागार: मुख्यमंत्र्यांचा स्वत:च्याच पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांवर अविश्वास शिवसेनेच्या अनुभवी मंत्री, आमदारांमध्ये नाराजी
मुंबई : प्रतिनिधी मागील ४०-४५ वर्षे शिवसेनेसाठी काम करत आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे आणि यशस्वीतेने पार पाडली. आता सत्तेत आल्यानंतर पक्षात काल परवापर्यंत आलेल्या नवख्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यातच आता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रशासनातील व्यक्तीवर सल्लागाराची जबाबदारी सोपविल्याने पक्षप्रमुखांचाच पक्षा नेते-कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? असा सवाल शिवसेनेतील …
Read More »कोरोना : पहिल्यांदाच बाधितांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त तरीही ३८९० नवे रूग्ण, २०८ जणांचा मृत्यू तर ४१६१ रूग्ण बरे होवून घरी
मुंबई: प्रतिनिधी राज्यात ८ मार्च पासून दररोज कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र आज पहिल्यांदाच कोरोनाबाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची एकूण आकडेवारी वाढलेली दिसत आहेत. मागील २४ तासात ३८९० नव्या रूग्णांचे निदान झाले तर २०८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ४१६१ रूग्ण घरी गेल्याने बरे झालेल्या रूग्णांची एकूण …
Read More »मंत्री भुजबळांच्या या मागणीला दानवेंच्या मंत्रालयाने दिली परवानगी जास्तीच्या मका खरेदीला दिली परवानगी
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यात मका धान्याची खरेदी करूनही आणखी मका शिल्लक असल्याने त्याची वाढीव खरेदी करण्यास केंद्राने मान्यता द्यावी अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केली. त्यावर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने त्यास तातडीने मान्यता दिली. विशेष म्हणजे केंद्राच्या या मंत्रालयाचे भाजपा नेते …
Read More »महिन्यात दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने बरे झालेल्या ४१६१ रुग्णांना सोडले मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत …
Read More »परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड विरहीत प्रवासासाठी कृतीदल शुक्रवारी होणार बैठक
मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या विष्णूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतूकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधीसह परिवहन मंत्री अँड अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल ( Transport Task force) स्थापन करण्यात आले आहे. राज्यात कोविड-19 या विषाणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याच …
Read More »ठाणे, औरंगाबाद, लातूरसह या जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हा व शहर अध्यक्ष जाहीर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नऊ जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्यांची आज घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या अनुमतीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीशैल मल्लीकार्जून उटगे तर लातूर शहरच्या अध्यक्षपदी ऍड किरण …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ, महागाई भत्ता, प्रवास भत्ता बंद ? लॉकडाऊन शिथिलीकरणानंतरही महसूल जमा रकमेत वाढ नसल्याने सरकारचा विचार
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थव्यवस्था अजूनही पूर्वपदावर आली नसल्याची स्पष्टोक्ती देवून २४ तासाचा अवधी उलटत नाही. तोच ७ व्या वेतन आयोगानुसार द्यायच्या २ऱ्या टप्प्यातील हप्ता एक वर्षानंतर देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यानंतर आता यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पगारवाढ, महागाई भत्ता, प्रवास भत्ता काही …
Read More »शरद पवार : पडळकरांची टीका भाजपा नेते सावध तर राष्ट्रवादीचे प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र शांत
पंढरपूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व बहुजनांच्या चळवळी मारून टाकणारे शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याची टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत पडकरांच्या या वक्तव्याप्रकरणी भाजपाने सावध पवित्रा घेत पक्षाचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने ते एकटे पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या …
Read More »कोरोना : २४८ मृतकांची नोंद, पण आकडेवारी २४ तासातील नाही ३२१४ नव्या रूग्णांचे निदान, ६९ हजार रूग्ण घरी
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आरोग्य विभागाकडून सध्या मृतकांच्या संख्येवरून घोळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत असून २४ तासात झालेल्या मृतकांची आकडेवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्वाधिक २४८ रूग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले तरी ही आकडेवारी २४ तासातील नाही तर यातील ७५ मृत्यू ४८ तासातील …
Read More »
Marathi e-Batmya