मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार …
Read More »नागरिकांनो सावधान ! चीनी हॅकर्स सक्रिय सायबर विभागाचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे बालासिंग राजपूत यांनी केले. चीनच्या हॅकर्सनी २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट …
Read More »बँकांनो शेतकऱ्यांना कर्ज नाकाराल तर फौजदारी गुन्हा गृहमंत्री अनिल देशमुख याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे …
Read More »विवाहोत्सुकांच्या लग्नाचा मार्ग मोकळा ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभास परवानगी- विजय वडेट्टीवार
मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्याहून अधिक काळ लग्नाची तयारी असूनही लॉकडाऊन आणि संचारबंदी मुळे लग्न करण्यास विवाहोत्सुकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर विवाहोत्सुक आणि सामाजिक गरज लक्षात घेवून ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती आपत्ती, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोरोना …
Read More »मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा …
Read More »भाजपापाठोपाठ राज्यपालांनाही विसर राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीचा डाक विभागातील करोना बाधितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत
मुंबई: प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत निधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आजही करत आहेत. मात्र राज्यातील भाजपाच्या नगरसेवक, आमदार, खासदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्याऐवजी केंद्राच्या पीएम केअर फंडाला मदत दिली. अगदी त्याच धर्तीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाही त्यांनी …
Read More »अंध असूनही अविरत सेवा बजाविणाऱ्या त्या दोघांना मुख्यमंत्र्यांनी दिली शाबासकी सेंट जॉर्ज हॉस्पीटलच्या ऑपरेटला फोन
मुंबई : प्रतिनिधी दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून…. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !! दोन्ही डोळ्यांनी अंध …
Read More »अर्थव्यवस्था अद्यापही पूर्वपदावर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्वच आर्थिक केंद्रे बंद असल्याने तिजोरीत फारसा महसूल जमा झाला नाही. तसेच विद्यमान परिस्थितीतही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कामांसाठी लागणारा निधी कसा जमा केला जातोय याची माहिती आम्हालाच असल्याचे स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमुत्री अजित पवार यांनी दिली. जळगांव, सोलापूर यासह अन्य भागात जी काही रूग्णांची संख्या …
Read More »उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदल्या कोरोनाग्रस्तांची वाढत्या संख्येमुळे सरकारकडून बदल्या
मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहराबरोबर उपनगरातील नवी मुंबई, मीरा भांईदर आणि उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर या ठिकाणच्या तिन्ही महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.विजय राठोड यांची …
Read More »कोरोना: २४ तासात ० मृत्यू ? मात्र ४८ तास आणि तत्पूर्वी मिळून ११३ जणांचा अंत ३ हजार ७२१ नवे रूग्ण, घरी जाणारे ६७ हजार तर अॅक्टीव्ह ६१ हजार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दररोज बाधित आणि मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र मागील २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रात ३७२१ नव्या रूग्णांचे निदान झालेले असताना २४ तासात मृत्यू पावलेल्यांची नोंद आज आरोग्य विभागाने पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात दाखविण्यात आली नाही. मात्र मागील ४८ तासात ६२ जणांचा तर ५१ जणांचा यापूर्वीच मृत्यू …
Read More »
Marathi e-Batmya