मुंबई : प्रतिनिधी दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत दीघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. यामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगार संधी निर्माण होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार …
Read More »१३९ जणांचा मृत्यू, एकूण संख्या ८० हजारापार अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० टक्क्यावर मुंबईत २५ हजारावर, २४ तासात १४७५ जणांना घरी सोडले
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्येत एका बाजूला घट होताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रूग्ण्यांच्या संख्येत म्हणावी तशी प्रगती होताना दिसत नाही. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण आणि मृत पावणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्याची ८० हजारापार गेली तर आज तब्बल १३९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद …
Read More »पर्यावरण विभागाचे नाव आता “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग” पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करणार असल्याची पर्यावरण मंत्री ठाकरेंची माहिती
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता “पर्यावरण व वातावरणीय बदल” विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री …
Read More »मेडिकलच्या परिक्षा १५ जूलै ते १५ ऑगस्ट किंवा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर मध्ये होणार वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या आराखड्याला राज्यपालांची मंजूरी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १५ जुलै पासून किंवा १६ ऑगस्टपासून परिक्षा घेण्याचा आराखडा तयार केला. या आराखड्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय …
Read More »१२३ मृत्यू : २९३३ नव्या रूग्णांची नोंद, अॅक्टीव्ह आणि एकूण संख्येत ३३ हजाराचा फरक ८० हजाराच्या संख्येकडे वाटचाल
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून कोरोनाग्रस्तांच्या रूग्णवाढीच्या दरात घट झाल्याचे सांगत असले तरी आज १२३ जणांचा मृत्यू झाला. तर २९३३ रूग्णांची नव्याने नोंद झाली असून एकूण रूग्ण संख्या ७७ हजार ७९३ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४१ हजार ३९३ वर …
Read More »१ मे रोजी राज्यातील एकूण चाचण्यांत मुंबई ५६ टक्के, तर ३१ मे ला २७ टक्के ? विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवित राज्यातील बळींच्या वाढत्या संख्येवर व्यक्त चिंता
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र ५० टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे, याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून लक्ष वेधले आहे. मुंबईत मृत्यू …
Read More »मिशन बिगीन अगेनमध्ये मुंबईसह राज्यात या सवलती नव्याने मिळणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून घोषणा
मुंबई: प्रतिनिधी रूतलेल्या अर्थव्यवस्थेला चालना आणि थांबलेले जनजीवन पुन्हा एकदा सुरुळीत व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेत काही गोष्टी शिथीलही केल्या. मात्र आता त्यात नव्याने काही सवलती समाविष्ट करण्यात आल्याने मिशन बिगीन अगेन आणखी सुसह्य झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिक सवलती खालीलप्रमाणे- पहिल्या टप्यात-बाग-बगीछे, …
Read More »पावसाळी अधिवेशनात केंद्राने नव्याने पुरवणी अर्थसंकल्प मांडावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
कराड: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या लॉकडाउन मुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक परिस्थितीत केंद्र शासनाने १ फेब्रुवारी ला सादर केलेले वार्षिक अंदाजपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ करीता अंदाजित केलेले राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) कर व कराशिवाय महसूल, कर्जाद्वारे उभा करावयाचा निधी तसेच विकास कामांवरील नवीन प्राधान्यक्रम अशा सर्वच आकड्यांचे संदर्भ बदलले …
Read More »छोट्या छोट्या गोष्टीतील सुख दाखविणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन ९० व्या वर्षी निधन
मुंबई: प्रतिनिधी मानवी आयुष्य क्षणभंगुर असले तरी या वाट्याला आलेल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत खुप मोठे सुख असते याची जाणीव नव्याने समाजाला करून देणारे प्रसिध्द दिग्दर्शक, पटकथाकारक बासू चटर्जी यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांचा जन्म अजमेर येथे १० जानेवारी १९३० रोजी झाला. चटर्जी यांनी सुरुवातीला कार्टुनिस्ट …
Read More »राज्यातील १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक तर १२ हजार ६६८ च्या निवडणूका स्थगित ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून राज्यपालांकडे तशी शिफारस करण्यात येत असल्याचे सांगत …
Read More »
Marathi e-Batmya